Supriya Sule News: लोकसभा निवडणूकीबाबत आम्ही कॉफिंडन्ट आहोत, ओव्हर कॉफिंडन्ट नाही- सुप्रिया सुळे

MP Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, मिलिंद देवरांचा राजीनामा या सगळ्या विषयांवर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
MP Supriya Sule
MP Supriya Sule Saam Tv
Published On

Supriya Sule Criticized BJP

सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करतांना लोकसभा निवडणुकीविषयी आम्ही कॉफिंडन्ट आहोत, पण ओव्हर कॉफिंडन्ट नसल्याचं त्या म्हणाल्या. भाजपनंबरमध्येच अडकतात. आत्ता ४५ म्हणतात पुढे ५०+ पण म्हणतील, असं म्हणत सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. (latetst political news)

मिलिंद देवरा सोडून गेले. कारण मित्र पक्षाला ती सीट शिवसेनेला गेली. मला वाटतं नाही की, ते सोडून गेले तर काही फरक पडेल. त्यांना तिकीट ऑफर केलं असेल. काँग्रेसमध्ये त्यांच्या वडिलांना मंत्रीपद होतं. काँग्रेसमध्ये अंतर्गत काय झालं माहिती नाही. दक्षिण मुंबईत कोणी उमेदवार नसावा म्हणून ते गेले असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नारायण राणे हे भाजपचे (bjp) असंवेदनशील नेते आहेत. त्यांची अनेक विधाने दिसतात. शेवटी त्यांना आवर घाला असं दिल्लीतून सांगितलं जातं, असंही सुळे म्हणाल्या. भाजप इतर वेळी आम्हाला प्रवचन करतात. संस्कारांसंदर्भात बोध देतात, त्यामुळं या संदर्भात आता भाजपला विचारायला हवं. लोकसभा जागेवाटपाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, पुढच्या ८-१० दिवसांत उमेदवारांसह तुम्हाला कळेल. इंडिया आघाडीवर बोलताना त्या ( Supriya Sule) म्हणाल्या की, संविधानाच्या चौकटीतून इंडिया आघाडीकडून चेहरा देण्यात येईल.

भुमरेंबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. भाजपने भ्रष्टाचार मुक्त राज्य सांगितलं होतं. मग, या शब्दाचं काय झालं. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. अटल सेतूवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे मुंबई घाटातच दीड तास जातो. मी आजच त्या रस्त्याने प्रवास केलाय. टोल मुक्त भारत, असा केंद्र सरकारने शब्द दिला होता. राज्यात सुद्धा टोल घेणार नाही, असं राज्य सरकारने सांगितलं होतं. मग, त्याचं काय झालं हा पण जूमला आहे का? असाही सवाल त्यांनी ( Supriya Sule) विचारला आहे.

MP Supriya Sule
जुन्नर विधानसभेतून Satyashil Sherkar यांना Sharad Pawar गटाकडून तिकिट मिळणार?

राहुल गांधी (Rahul Gandhi) विकास, प्रेम आणि गांधीजी यांचा आदर्श घेऊन न्याय यात्रा करतात. या यात्रेचा कुठलाही फायदा किंवा तोटा नाही. एक भूमिका या यात्रेतून दिसते, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या काळाराम मंदिरबद्दलच्या भूमिकेबद्दल बोलताना सुप्रिया म्हणाल्या की, भाजपने संसदेच्या नवीन इमारतीच्यावेळी राष्ट्रपतींना बोलावलं नव्हतं. म्हणून उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे, त्यासाठी त्यांच्या भूमीकेचे मी स्वागत करते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आनंद आणि समाधान वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यावेळी दर्शनाला जाणार का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी रोजच दर्शन करते. मला तुमच्यामध्येही पांडुरंग दिसतो. मंदिर, मस्जिद,चर्च, गुरुद्वारा या अशा जागा आहेत, की तिथे जायला कोणाचे आमंत्रण लागत नाही. २२ तारखेला माझा लोकसभा मतदारसंघ मुळशीमध्ये कार्यक्रम असल्याचं त्यांनी ( Supriya Sule) म्हटलंय.

MP Supriya Sule
Sanjay Raut News | भाजपने 22 जानेवारीला हिंदूंची माफी मागावी, राऊतांचा BJP आणि राणेंवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com