Shiv Sena: कधी आणि का स्थापन झाली होती शिवसेना? राजकारणात कशी आली, किती वेळा बदललं चिन्ह?

Shiv Sena : राज्यातील राजकारणात शिवसेनेचा मोठा दरारा आहे. महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेशिवाय पूर्ण होत नाही. शिवसेना कार्यकत्यांनी बंद पुकरला किंवा राडा केला तर अख्या महाराष्ट्र बंद होतो. असा दररा ठेवणाऱ्या शिवसेनेचा इतिहास काय हे जाणून घेऊ ..
Shiv Sena  UBT
Shiv Sena UBTSaam Tv
Published On

Shiv Sena UBT Party Sign History:

आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड पुकारत उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेनेला तडा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या सल्लानंतर १९६६ मध्ये शिवसेना संघटनेची स्थापना केली. आजही पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा शिवसेनेचं चिन्ह हे डरकाळी फोडणारा वाघ होता.(Latest News)

दरम्यान आजही पक्षाच्या कामासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. वडिलांच्या सल्लानंतर बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या संघटनेला राजकीय पक्ष बनवत १९६८ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. राज्यातील राजकारणात शिवसेनेचा मोठा दरारा आहे. महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेशिवाय पूर्ण होत नाही. शिवसेना कार्यकत्यांनी बंद पुकरला किंवा राडा केला तर अख्या महाराष्ट्र बंद होतो. असा दररा ठेवणाऱ्या शिवसेनेचा इतिहास काय हे जाणून घेऊ ..

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण

बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेना लढा देत होती. शिवसेनेची स्थापना झाली होती, त्यावेळी ८०टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण धोरण बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलं होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्राचा नारा दिला होता. वर्ष १९७० च्या काळात शिवसेना मोठी लोकप्रिय झाली होती. भूमि पुत्र स्थानिक लोकांना नोकरी मिळावी, यासाठी शिवसेनेने मोठं आंदोलन उभे केले होते. या आंदोलनात परप्रांतातील लोकांना राज्यातून बाहेर काढण्यात आलं.

दरम्यान १९७० नंतर शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रभाव कमी होऊ लागला. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वचा नारा दिला. वर्ष १९८९ मध्ये भाजपसोबत शिवसेनेने युती केली. दोन्ही पक्षाची युती केल्यानंतर शिवसेनेचे ४ खासदार लोकसभेत पोहोचले. त्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा १९९० मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी शिवसेनेचे ५२ सदस्य आमदार होऊन विधानसभेत पोहोचले. दरम्यान २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. २०१४च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी परत युती केली. पण २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी वेगळा मार्ग पकडला.

आधी वाघ, नंतर इंजिन मग शिवसैनिकांच्या हाती आलं धनुष्य

वर्ष १९६६ मध्ये तयार झालेल्या शिवसेनेला १९६८मध्ये ढाल आणि तलवारचं चिन्ह देण्यात आलं. याच चिन्हाची ढाल तलवार घेऊन शिवसेनेचे सदस्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मैदानात उतरले होते. यानंतर १९७८ मध्ये शिवसेनेला रेल्वे इंजिनचं चिन्ह मिळालं होतं. १९८० मध्ये इंजिनच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

त्यानंतर १९८५च्या विधानसभेपर्यंत शिवसेनेला अनेक चिन्हे मिळाली होती. १९८९ मध्ये शिवसेनेचे ४ खासदार जेव्हा लोकसभेत गेले होते त्यावेळी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होतं. दरम्यान एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड पुकारत शिवसेनेत फुट पाडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह आहे. महाराष्ट्रात शिवसेना मुंबई आणि कोकण परिसरात शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे. दरम्यान २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुंबईत पराभव झाला होता.

दरम्यान शिवसेनेत अध्यक्षऐवजी प्रमुख हे पद असतं. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर या पदावर होते. त्यांच्या निधनानंत उद्धव ठाकरेंनी हे पद आपल्याकडे घेणं टाळलं होतं. तर आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे प्रमुख आहेत.

Shiv Sena  UBT
Shivsena MLA Disqualification Result: एकनाथ शिंदेंची पक्षातील हकालपट्टी मान्य करता येणार नाही; विधानसभा अध्यक्षांचे मत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com