Nashik Rural Police Song Viral: 'भिमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं...'; पोलिसांनी एक सुरात गायलं गाणं, व्हिडिओ व्हायरल

Nashik Rural Police Song Viral: पोलिसांचा एक सुरात गाणं गायलेला रील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nashik Rural Police Song Viral
Nashik Rural Police Song ViralSaam tv
Published On: 

Police viral video: पोलीस शब्द उच्चारला तर दरारा, धाक, कडक शिस्त असलेल्या व्यक्तीच्या प्रतिमा डोळ्यांसमोर उभे राहतात. मात्र, आता सोशल मीडियामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रतीमा काही प्रमाणात बदलताना दिसत आहेत. काही पोलीस कर्मचारी रील्सच्या क्रेझमुळे त्यांच्या सवडीनुसार कला जोपासताना दिसत आहेत.

याच सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांमध्ये रील्स व्हिडिओची क्रेझ वाढली आहे. रील तयार करण्याचा मोह आता पोलिसांनाही आवरता येत नसल्याचे समोर आले आहे. याच शिस्तबद्ध पोलिसांचा एक सुरात गाणं गायलेला रील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी एक सुरात गायलं गाणं

जगभरात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांमध्ये रील्स व्हिडिओची क्रेझ वाढली आहे. लहान मुलं,गृहिणी, नोकरी करणारा व्यक्तीही आता रील्स व्हिडिओ तयार करताना दिसत आहे. या रील्समुळे अनेक जण सोशल मीडिया स्टार झाले आहेत.

या रील्समुळे अनेक पोलीस कर्मचारीही सोशल मीडिया स्टार झाले आहेत. या रील्स व्हिडिओची क्रेझ पोलीस विभागातही प्रचंड असल्याची दिसून येत आहे. या पोलीस विभागातील नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक सुरात गाणं गायलेला रील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Nashik Rural Police Song Viral
Viral Video: क्षणात होत्याच नव्हतं... धबधब्याखाली खेळताना तरुणांसोबत घडलं भयंकर; हौशी पर्यटकांनी व्हिडिओ पाहाच!

भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं...

नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका सुरात 'भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं' हे भीमगीत गायलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

याच पोलिसांच्या गायनाचा व्हिडिओ अभिनेते, गायक, बिगबॉस फेम उत्कर्ष शिंदे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे. या रील व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच तीन हजारांहून अधिक जणांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वीस हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सर्वात बेस्ट व्हिडिओ...

इन्स्टाग्रामवर कॉप्स राहुल या इन्स्टा युजरने व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या व्हिडिओ अनेकांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यांने म्हटले आहे की, खूप अभिमान वाटत आहे'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'इन्स्टाग्रामवर आज बघितलेला सर्वात बेस्ट व्हिडिओ'.

तत्पूर्वी, पोलीस दल नेहमी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतो. पोलीस विभाग नेहमी लोकांच्या सेवेत व्यग्र असतो. दिवसभरातील काहीसा वेळ स्वत:साठी खर्च करत असतात. अनेक पोलीस त्यांचं काम सांभाळून कलेसाठी वेळ देतात.

Nashik Rural Police Song Viral
Shiv Thakare Viral Video:‘तुम्ही बिग बॉसमधल्या शिवसारखे दिसता...’ चिमुकल्या चाहत्याच्या प्रश्नावर शिवचे मजेशीर उत्तर; व्हिडिओ व्हायरल

रील्समुळे पोलिसांना मिळाली प्रसिद्धी

देशासहित राज्यातही खाकी वर्दीत अनेक कलाकार दडलेले आहेत. अनेक पोलिसांना त्यांच्या कलेची दाद मिळाली आहे. पोलीस हवालदार अमोल कांबळे हे आता डान्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. तर पोलीस कर्मचारी संघपाल तायडे हे गायक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.