Shiv Thakare Viral Video:‘तुम्ही बिग बॉसमधल्या शिवसारखे दिसता...’ चिमुकल्या चाहत्याच्या प्रश्नावर शिवचे मजेशीर उत्तर; व्हिडिओ व्हायरल

Shiv Thakare And Fans Viral Video: सोशल मीडियावर सध्या शिवचा आणि त्याच्या फॅनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो त्याच्या एका चाहत्याची फिरकी घेताना दिसत आहे.
Shiv Thakare And Fans Viral Video
Shiv Thakare And Fans Viral VideoInstagram

Shiv Thakare News: ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. शिव ठाकरेचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. बिग बॉस मराठी २, बिग बॉस १६ नंतर शिव ठाकरे खतरों के खिलाडी १३ मध्ये दिसला होता.

शिव ठाकरे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच शिवच्या फॅन पेजवरून त्याच्या फॅनसोबतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो त्याच्या एका चाहत्याची फिरकी घेताना दिसत आहे.

Shiv Thakare And Fans Viral Video
Parineeti - Raghav Wedding Date: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख ठरली? या दिवशी शाही थाटात पार पडणार लग्नसोहळा

या व्हायरल व्हिडीओमध्ये शिव ठाकरे त्याच्या कारमध्ये बसलेला दिसून येत आहे. त्याच्याजवळ त्याचा एक चाहता येताना दिसून येत आहे. आणि त्याला व्हिडीओमध्ये म्हणतो, “तुम्ही मला बिगबॉसमधल्या शिवसारखे दिसता म्हणून मी, तुमच्या जवळ आलो.” चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर शिव त्याची चांगलीच फिरकी घेतो.

तो म्हणतो, “मला बऱ्याचदा लोकं म्हणाले की, मी शिव सारखाच दिसतो. मी नागपूरजवळ राहतो, आणि तो मुंबईत राहतो.” ‘शिवसारखा दिसतो का नाही मी?’ असं म्हणत त्याने चाहत्याला स्वत:चे फोटो काढून दिले आहेत. आणि सोबतच त्याला चांगल्या पोजही दिल्या.

सध्या शिवचा आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून शिवच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. शिवचा आणि त्याच्या चाहत्याचा हा व्हिडीओ एका फॅन पेजने शेअर केला आहे. यावेळी शिवच्या साधेपणाचे दर्शन पुन्हा एकदा व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून झाले आहे.

Shiv Thakare And Fans Viral Video
Milind Gawali Post: एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख... आई कुठे काय करते मालिकेचे 1000 भाग पूर्ण झाल्यानंतर मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

शिवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याने अनेक टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे. एमटिव्ही रोडिज, बिग बॉस मराठी २, बिग बॉस १६च्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या सुरू असलेल्या ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये शिव ठाकरे स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com