Viral Video News: पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक पावसाची मजा घेत असतात. अनेकदा पर्यटनस्थळी अतिउत्साही तरुणांकडून धागडधिंगा केलेलाही पाहायला मिळतो. मात्र अशी मस्ती बऱ्याचदा अंगलट येवू शकते. याचाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या उत्तराखंडमध्ये पावसाने (Uttarakhand Rain) हाहाकार माजवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून पर्यटनस्थळी जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही अतीउत्साही तरुणांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, जे त्यांच्या जिवावर बेतले आहे.
धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत असताना अचानक दरड कोसळल्याने पर्यटक वाहून गेल्याचा भयंकर व्हिडिओ सध्या (Viral Video) व्हायरल होत आहे. अवघ्या ८ सेकंदात या पर्यटकांवर निसर्गाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तराखंड पोलिसांकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
क्षणात होत्याच नव्हतं...
व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, काही पर्यटक उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत आहेत. काही मुले आणि तरुण या ठिकाणी पाण्यात मस्ती करताना दिसत आहेत. अचानक पुढच्याच क्षणी त्यांच्यावर दगड आणि मातीचा लोट कोसळतो, ज्याखाली सगळेच गाडले जातात. ही मन हेलावणारी घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उत्तराखंड (Uttarakhand Police) राज्यातील चमोली पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. काही जणांनी या घटनेत कोणी वाचले की नाही? असा सवाल विचारला आहे तर काही नेटकऱ्यांनी पर्यटनस्थळांवर अतिउत्साह न दाखवण्याचाही सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.