Talathi Exam schedule Change: तलाठी भरती परिक्षेतील विघ्न काही संपण्याचे नाव घेत नाही. आज सकाळपासून तलाठी भरती परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या अडथळ्यानंतर आता परीक्षेच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ आता बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशा सुचनाही परीक्षा केंद्रांवर लावण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तलाठी भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ काही संपण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता आता तलाठी परिक्षा असलेल्या अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने मुलांचा खोळंबा झाला आहे.
सकाळी नऊ वाजता पेपर सुरू होणार होता. मात्र परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सर्व्हरचा प्रोब्लेम झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर आता आजच्या पेपरच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. बदलत्या वेळेनुसार दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणारा पेपर 2 ते 4 या वेळेत होणार आहे.
आमदार रोहीत पवार संतापले..
दरम्यान, या सर्व गोंधळावर विद्यार्थीवर्गासह राजकीय नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय... अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
तसेच "सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?" अशा शब्दात रोहीत पवार यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.