सोशल मीडियावर अनेक जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी व्हिडिओ नवरा- बायकोच्या भांडणाचे असतात तर कधी त्यांच्यातल्या प्रेमळ नातं दर्शविणारे असतात. अशातच सोशल मीडियावर एक घटना समोर आली आहे,ज्यात एका वयोरूद्ध नवऱ्याने जीवाची बाजी लावून आपल्या बायकोचे प्राण वाचवले आहेत. नेमक कस ते आपण पाहूयात... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पत्नीसाठी लावली जीवाची बाजी....
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरात वास्तव्यास असणारे ग्यानबाजी धनविजय यांनी आपल्या वयाच्या ७९ वर्षी आपल्या पत्नीसाठी जीवाची बाजी लावलेली आहे. नागपूरात शुक्रवारी (ता.८)रोजी पहाटे ही घटना घडलीये. पहाटे झोपलेले असलेल्या धनविजय यांच्या घराबाहेरील गेट तोडून दोन बैलांनी त्याच्या घरात प्रवेश केला. काही तरी आवाज आल्याने धनविजय यांची झोप मोडली
तोपर्यंत बैल एका खोलीच्या बाजूला असलेल्या पॅसेजमध्ये घूसले. तिथे धनविजय यांची पत्नी झोपलेली होती. आपल्या पत्नीला काही होऊ नये यासाठी धनविजय बैलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. तेवढ्यात आपल्या हुशारीने धनविजय यांनी एका बैलाला वॉशरूममध्ये भरकटवले तसेच दुसरा बैल गेटच्या बाहेरच्या दिशेने गेला.
काही वेळानतंर वॉशरूमधून बैल बाहेर येताना दिसतो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धनविजय वॉटर कुलरच्या पाठीमागे लपतात, ज्यामध्ये चिडलेल्या बैलाने धडक दिल्याने कुलर त्याच्यांवर पडला. त्यानंतर बैल कुलरवर चढला आणि त्यात धनविजय मोठ्या कुलरमध्ये अडकले जातात. दैव बैलवत्तर म्हणून बैल धनविजय यांना अजून हाणी न पोहचवता तिथून निघून जातो.
दरम्यान धनविजय याच्या लहान मुलाने आणि मुलगी तिथं येते. दोघं मिळून वडिलांना कुलरमधून बाहेर काढतात. यात बैलांच्या धूमाकूळात धनविजय यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात नेण्यात येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.