Haryana News: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवला खरा रंग; सासरच्यांचं वाढलं टेन्शन

Bride Ran Away: पहाटे ४ वाजता नवरीने घराती धनसंपत्ती लंपास केली आणि फरार झाली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींचे मोठे नुकसान झाले असून संपू्र्ण गावात या घटनेचीच चर्चा होतेय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Haryana News
Haryana NewsSaam TV
Published On

Haryana:

हरियाणामधून (Haryana) चोरीची एक डोकं चक्रावणारी घटना समोर आली आहे. सासरी नांदायला आलेल्या नव्या नवरीने आपल्याच घरात चोरी केली आहे. पहाटे ४ वाजता नवरीने घरातील धनसंपत्ती लंपास केली आणि फरार झाली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण गावात या घटनेचीच चर्चा होतेय.

Haryana News
Nagpur Crime News: शोभायात्रा पाहून परतताना युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेवाडी गावात ही घटना घडली आहे. राजकुमार शर्मा असं नवरदेवाचं नाव आहे. आपल्या लग्नामुळे तो फार खुश होता. घरात नवी नवरी (Bride) आल्याने आनंदाचं वातावरण होतं. नवरीला पाहण्यासाठी संपूर्ण गावातून व्यक्ती तिला पाहण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी येत होते. गावात सुंदर नवरीची चर्चा होती. पुढे ही चर्चा चोरीबाबत होईल असं कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं.

नवरी आपल्या सासरी आल्यावर तीन दिवस मोठ्या आनंदाने राहिली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिने तिचा डाव साधला. नवरीने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पळून जाण्याचा प्लान आखला. तिसऱ्या दिवशी ती पहाटे ४ वाजता उठली. घरात सगळे झोपले असताना तिने सावकाश कपाटातील आणि तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरले आणि ती फरार झाली.

सकाळी घरातील इतर मंडळी उठल्यावर त्यांना नवरी बराचवेळ कुठेच दिसली नाही. काही वेळ वाट पाहिल्यावर सर्वांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर तिच्या आई बाबांची भेट घेण्यात आली. मात्र याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपली फसवणूक झाली असून नवरी दागिने घेऊन फरार झाल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी नवरीचा फोटो जवळ घेतला असून घराबाहेर असलेले सीसीटीव्ही तपासले आहे. यात नवरी पहाटे ४ वाजता घराशेजारी असलेली भींत ओलांडून पळून गेल्याचं दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणी नवरीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा तपास सुरू आहे.

Haryana News
Crime News : पोटच्या मुलानंच वडील अन् बहिणीला संपवलं; ४८ तास मृतदेहांजवळ होता बसून, दुहेरी हत्याकांडामागचं कारण चक्रावणारं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com