Lion Attack Viral Video: पिंजऱ्यात एन्ट्री करताच सिंहाने केला हल्ला, फरफटत नेले, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Viral Video Marathi News: एक व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये एन्ट्री करतो. अचानक सिंह त्याच्या पाठीमागून येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो.
Lion Attack Viral Video
Lion Attack Viral VideoSocial Media
Published On: 

Lion Attack On Man: सोशल मीडियावर (Social Media) जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये जंगली प्राण्यांचे हल्ला करतानाचे देखील व्हिडिओ असतात. हे व्हिडिओ पाहून कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जंगली प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या प्राण्याने एखाद्या प्राण्यावर हल्ला केला नाही तर, त्याने माणसावर हल्ला केला आहे. हा प्राणी दुसरा तिसरा होणी नसून जंगलाचा राजा सिंह आहे. या सिंहाने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Lion Attack Viral Video
Petrol Pump Bike Fire: बाईकमध्ये पेट्रोल भरताना बायकोचा फोन आला; उचलताच तरुणासोबत घडली भयानक घटना

@earth.reel या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये सिंह माणसावर हल्ला करताना दिसत आहे. जंगलाचा राजा असणारा सिंह हा हिंस्त्र प्राणी आहे. सिंह जंगलात असो वा पिंजऱ्यात तो हल्ला केल्याशिवाय राहत नाही. माणसाने त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो हल्ला करतोच.

Lion Attack Viral Video
Nap In Restaurant Viral Video: खाऊन पिऊन घ्या झोपून; रेस्टॉरंटची भन्नाट ऑफर आहे तरी काय?

वन्य प्राण्यांना बरीच लोकं घाबरतात. या प्राण्यांना पाहण्यासाठी जंगल सफारी केली जाते. त्याचसोबत प्राणी संग्रहालयात देखील या प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. पण कधी कधी या प्राण्यांची मस्करी करणं, त्यांना त्रास देणं अथवा त्यांच्या जवळ जाणं अनेकांना महागात पडल्याचे व्हिडिओ आतापर्यंत आपण पाहिले आहेत. असे असताना सुद्धा काही लोकं त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतातच. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील एक व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये एन्ट्री करते. पण अचानक सिंह त्यांच्यावर हल्ला करतानाचे दिसते.

Lion Attack Viral Video
Crocodile Viral Vieo: पाण्यात पाय ठेवून तरुण निवांत बसला होता; अचानक मगर आली अन् पुढे जे घडलं ते भयंकरच

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये एन्ट्री करतो. अचानक सिंह त्याच्या पाठीमागून येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. आपल्या जबड्यामध्ये या व्यक्तीचे तोंड पकडून तो त्याला परफटत नेतो आणि फेकून देतो. पिंजऱ्याच्या बाहेर उपस्थित असलेले दोन व्यक्ती आरडाओरडा करताना दिसतात. मात्र त्या व्यक्तीच्या मदतीसाठी कोणी पिंजऱ्यामध्ये येत नाही. व्हिडिओच्या शेवटी हा सिंह या वक्तीचं डोकं पुन्हा पकडून त्याला खेचत नेताना दिसतो. आता ही व्यक्ती जिवंत आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com