आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करून धावांचा पाऊस पाडणाऱ्या वैभव सूर्यवंशीला काव्या मारनने गिफ्ट दिलंय...होय, काव्या वैभवला घड्याळ गिफ्ट देतानाचा फोटो व्हायरल होतोय...या फोटोत काव्या वैभवच्या हातात घड्याळ देत असताना दिसतंय...हा फोटो ज्या दिवशी राजस्थान रॉयलने सनरायझर्स हैदराबादला हारवलं त्या दिवशीचा आहे असल्याचा दावा केलाय...आता हा फोटो व्हायरल करून काव्याने पुढच्या वर्षी वैभवला आपल्या संघातून खेळण्याची ऑफर केल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच काव्याने वैभवला गिफ्ट दिलंय का...? या फोटोसोबत एक मेसेज व्हायरल होतोय...त्यात काय दावा केलाय पाहुयात...
वैभव सूर्यवंशीला अशी एक गोष्ट मिळाली जी आजपर्यंत कोणालाही मिळाली नाही.SRH च्या मालक काव्या मारनने वैभव सूर्यवंशीला एक घड्याळ भेट दिलं. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होतोय...पण, खरंच काव्याने वैभवला गिफ्ट दिलंय का...? आपल्या टीमला हारवल्यानंतरही काव्याने वैभवला गिफ्ट दिल्याची चर्चा आहे...वैभवचं वय 15 आहे, पण, त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहता, सगळ्यांनाच भूरळ पाडली...मूर्ती लहान पण किर्ती महान अशीच त्याची कामगिरी यावेळी पाहायला मिळाली...त्यामुळे काव्या मारनने वैभवला भेटून गिफ्ट दिलं आणि पुढच्यावेळी संघात खेळण्याची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? काव्याने वैभवला महागडं घड्याळ गिफ्ट दिलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...आम्ही हा फोटो नीट पाहिला...तसंच कुठे याबाबत बातम्या आहेत का पाहिल्या...? काव्या मारनचं सोशल मीडिया हँडलही आम्ही तपासून पाहिली...मात्र, घड्याळ देताना कुठल्याही कॅमेऱ्यात दिसलं नाही...त्यामुळे आम्ही अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
काव्या मारनने वैभव सूर्यवंशीला गिफ्ट दिलेलं नाही
वैभवला घड्याळ गिफ्ट देतानाचा फोटो एडिटेड
काव्या वैभवला भेटली पण गिफ्ट दिलेलं नाही
पहिल्या विंडोतील फोटो एडिटेड आहे...काव्या ही वैभवला मैदानात भेटली होती हे खरं आहे...तिने त्याला शुभेच्छाही दिल्या...मात्र, घड्याळ गिफ्ट दिलेलं नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत काव्या मारनने वैभव सूर्यवंशीला महागडं घड्याळ गिफ्ट दिल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.