Viral Video: सुनेचा निर्दयीपणा! वृद्ध सासऱ्याला काठीने बेदम मारहाण; खाली पाडलं अन्... थरकाप उडवणारा VIDEO

Daughter In Law Thrashes 87-year-old Father-in-law CCTV Footage: ही मारहाणीची घटना ९ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Karnataka News Daughter In Law Badly Beating 87-year-old Father-in-law by  Walking Stick CCTV Footage Goes Viral
Karnataka News Daughter In Law Badly Beating 87-year-old Father-in-law by Walking Stick CCTV Footage Goes Viral Saamtv
Published On

Women Beating Father In Law Viral CCTV Footage:

सासरा अन् सुनेचं नात बापलेकीसारखं असतं असं म्हणलं जातं. पण कर्नाटकमधून सासरा- सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) मंगळुरुमध्ये सुनेने आपल्या पित्यासमान सासऱ्याला घराचा दरवाजा लावून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून या निर्दयी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये (Mangluru) राहणारी महिला उमाशंकर ही विद्युत मंडळात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी या महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार नजिकच्या कनकनडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वृद्ध सासरे पद्मनाथ सुवर्णा यांच्या मुलींनी ही तक्रार दिली होती.

या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या निर्दयी महिलेला अटक केली आहे. ही मारहाणीची घटना ९ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. सुनेने वृद्ध सासऱ्याला केलेल्या मारहाणीची घटना घरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Footage) कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Karnataka News Daughter In Law Badly Beating 87-year-old Father-in-law by  Walking Stick CCTV Footage Goes Viral
Rahul Gandhi In Nandurbar : शेतकरी आणि आदिवासी समाजासाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; आमचं सरकार आलं तर...

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, आरोपी महिला आपल्या वृद्ध सासऱ्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. दरवाजा लाऊन घेत हातातील काठीने बेदम मारहाण करत आहे. वृद्ध सासरा वेदनेने विव्हळत असतानाही ती मारहाण करते. धक्कादायक बाब म्हणजे तिने सासऱ्याला धक्का देऊन जमिनीवर पाडल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, पद्मनाभ सुवर्णा यांची मुलगी प्रिया सुवर्णाने आणि तिचा भाऊ प्रीतम सुवर्णाच्या सूचनेवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून सध्या चौकशी सुरू आहे. (Latest Marathi News)

Karnataka News Daughter In Law Badly Beating 87-year-old Father-in-law by  Walking Stick CCTV Footage Goes Viral
Congress Jan Aakrosh Morcha: काँग्रेसचा लाखनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com