इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

Fact Check: ...मोदींनी जसं सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं, तसंच इंदिरा गांधींनी 1967 साली सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याचा दावा केला जातोय... हीच बातमी आहे, द हिंदू पेपरमधील...मुख्य पानावर द हिंदूने इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका असं आवाहन केल्याची बातमी 1967 साली छापली होती, असा दावा करण्यात आलाय...
A viral image falsely claims that Indira Gandhi urged citizens not to buy gold in 1967, but fact-checks confirm the clipping is fake.
A viral image falsely claims that Indira Gandhi urged citizens not to buy gold in 1967, but fact-checks confirm the clipping is fake.saam tv
Published On

पण, खरंच 1967 साली इंदिरा गांधींनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं का...? मोदींनी 2026 साली आवाहन केल्यानंतर आता इंदिरा गांधींनीही असंच आवाहन केल्याचा दावा केल्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय...यावरून काँग्रेस-भाजपमध्ये एकमेकांवर टीका केली जातेय...मात्र, या कात्रणामागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही या मेसेजमागचं सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही माहिती मिळवली...काही मॅकझिन्स पाहिल्या...दुसऱ्या कोणत्या पेपरमध्ये अशी बातमी होती का हेदेखील पाहिलं...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

इंदिरा गांधींनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलेलं नाही

व्हायरल होत असलेली बातमी द हिंदूच छापलेलीच नव्हती

6 जून 1967 साली द हिंदू पेपरमध्ये अशी बातमी नाही

द हिंदूच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो खोटा

6 जून 1967 साली इस्रायल-अरब राष्ट्रांमधील युद्धाची बातमी

तर 'द हिंदू'नेही त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून याबद्दल स्पष्टीकरण दिलंय...

6 जून 1967 रोजीच्या ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे मुखपृष्ठ असल्याचा दावा करणारी एक डिजिटल पद्धतीने बदललेला फोटो सोशल मीडियावर फिरतोय. हे आमच्या संग्रहातील खरं पान नाही.

द हिंदूचा फॉन्ट आणि व्हायरल फोटोतील फॉन्टही वेगळा आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत 1967 साली इंदिरा गांधींनीही सोनं खरेदी न करण्याचा सल्ला दिला होता हा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com