
Husband Wife Fighting Video: समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पतीला घरातच चोप देताना दिसत आहे. होय, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण ही घटना पाहिल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये दिसतं की, घरात एक नवरा भांडी घासत आहे. त्याच वेळी त्याची पत्नी संतापलेली आहे आणि ती तो काय करत आहे ते पाहत त्याच्या जवळ येते. संतापलेल्या महिलेचा अचानक संयम सुटतो आणि ती नवऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात करते. घरातच जोरदार आरडाओरड होते आणि हळूहळू वातावरण तापत जाते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेली ही घटना नेमकी कुठे घडली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओ पाहून तो भारतातीलच एखाद्या शहरातील असल्याचा अंदाज लावला जात आहे. घरगुती वाद आणि मानसिक तणाव शिवाय संवादाच्या अभावामुळे अशा घटना घडत असतात. या घटनेमध्येही असेच काहीसं दिसत आहे.
व्हिडिओ(Video) समोर आल्यानंतर नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''नक्कीच नवऱ्याने काही केलं असेल'' दुसऱ्या यूजरने लिहिले,''बिचारा भांडी घासत आहे तरी ती मारते'' तिसऱ्या यूजरने लिहिले,''नवऱ्याची चुक असेल'' शिवाय अनेकांनी म्हटलं की,''हे सर्व पाहून वाटते लग्नच नको करायला'' अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत
भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला शारीरिक इजा करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. मग ती व्यक्ती पुरुष असो की महिला. घरगुती हिंसाचार हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. नवऱ्यावर अशी मारहाण करणं म्हणजे त्याच्या स्वाभिमानावर आघात आहेच, पण शारीरिकदृष्ट्याही हा हल्ला मानला जातो.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.