Mumbai local train News : बापरे! लोकलच्या भर गर्दीत बकरीचा प्रवास; व्हिडिओ तुफान व्हायरल

goat viral video : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून चक्क एका बकरीने प्रवास केला. या बकरीने कुर्ला ते कल्याणपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास केला.
mumbai local train viral vid
mumbai local train Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनने गर्दीच्या वेळेत प्रवास करणे फार जिकरीचे होत चालले आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनने संध्याकाळी घरी जाताना चक्क दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. गर्दीच्या वेळेत लोकलच्या डब्यात नीट उभे राहण्यासाठीही जागा नसते. यामुळे अनेक प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीतून प्रवास करणे मुंबईकरांसाठी एक आव्हान बनत चाललं आहे. याच लोकल ट्रेनने चक्क एका बकरीने प्रवास केल्याचे समोर आलं आहे. एका प्रवाशाने बकरीला घेऊन लोकल ट्रेनने प्रवास केला. या बकरीचा लोकल प्रवास सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

mumbai local train viral vid
Nashik Shocking : विद्येच्या मंदिरातही मुली असुरक्षित; नाशकात प्राचार्याने विद्यार्थिनीसोबत केला लाजीरवाणा प्रकार, परिसरात खळबळ

लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची 'लाईफलाईन'. रोज लाखो प्रवासी प्रचंड गर्दीत प्रवास करतात. पण या लोकल ट्रेनमधील माल डब्यामध्ये सध्या बकऱ्यांचा प्रवास होतोय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. याममध्ये एका व्यक्तीने कुर्ला स्थानकावरून कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास केला. या प्रवाशाने सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांच्या लोकल ट्रेनमध्ये बकरीसोबत प्रवास केला.

mumbai local train viral vid
Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल

कुत्र्याचा लोकल ट्रेनने प्रवास

काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने लोकल प्रवास केला होता. प्रवाशांनी गच्च भरलेल्या लोकलच्या डब्ब्यात एक प्रवासी महिला कुत्र्याला सोबत घेऊन चढली होती. या प्रवासी महिलेने आपल्या बॅगेत कुत्र्याला ठेवलेले होते. महिलेने सोबत आणलेल्या कुत्र्याकडे लोकलमधील प्रवासी मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. लोकलमध्ये प्रवाशांना लवकर उभं राहायला जागा मिळत नाही, त्याच लोकलमध्ये एका कुत्र्याने सुखरुप प्रवास केलाय. या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

mumbai local train viral vid
Pune Koyta Gang : आम्हीच इथले भाई, पुण्यात कोयता गँगचा राडा; भर रस्त्यात कोयते उगारुन लोकांवर दगडफेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com