Dog Bite Case : शेजाऱ्याला चावला कुत्रा, मालकाला ४ महिन्याचा तुरुंगवास

dog bite case India : मुंबईतील वरळी परिसरात कुत्रा चावल्याने न्यायालयाने मालकाला ४ महिन्यांची शिक्षा सुनावली. सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्रा नेताना खबरदारी घेण्याचं महत्त्व अधोरेखित. काय आहे कोर्टाचा निर्णय?
Dog Attack
Dog AttackSaam tv
Published On

Mumbai News : घरी कुत्रा पाळणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. तुमचा कुत्रा कुणालाही चावला तर तुम्हाला आता जेलवारी होऊ शकते. ते कसं काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...तुम्ही जर घरी कुत्रा पाळला असेल. तर सावधान व्हा... कारण तुमचा कुत्रा कुणालाही चावला तर तुम्हाला जेलवारी होऊ शकते. यामागचं कारण ठरलयं... एका प्रकरणात न्यायालयानं दिलेला निर्णय. काय होतं ते प्रकरण पाहूयात...

वरळी परिसरातील अल्फा अपार्टमेंटमध्ये रमिक शाह लिफ्टमधून नोकर आणि मुलासह कामावर जात होत. त्यावेळी ऋषभ पटेल यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये जबरदस्ती ओढण्याचा प्रयत्न केला. चवताळलेल्या कुत्र्यानं यावेळी शाह आणि त्याच्या नोकराचा चावा घेतला. त्यानंतर शाह यांनी वरळी पोलिस ठाण्यात पटेल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आणि 7 वर्षांनंतर अखेर पटेल यांना 4 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी न्यायालयानं काय म्हटलयं पाहूयात...

Dog Attack
Thane : देशासोबत विश्वासघात, ठाण्यातून २७ वर्षांच्या इंजिनिअरला अटक!

शेजाऱ्याला चावला कुत्रा, 4 महिन्याची जेल

कुत्र्याला ओढण्यावरून आरोपीच्या मनात कुत्र्याविषयी राग

सार्वजनिक ठिकाणी आरोपीनं कुत्र्याला जबरदस्तीने नेले

आरोपीच्या कृत्यामुळेच तक्रारदाराला कुत्र्याचा चावा

पुरेशी खबरदारी न घेतल्यानं कुत्र्याचा मालक दोषी

कुत्र्याचा मालकाला 4 हजार दंड आणि 4 महिन्यांची जेल

Dog Attack
Crime : आईसोबत अनैतिक संबंध, मित्रानेच मित्राचा काटा काढला, मृतदेह शेतात पुरला, सोलापुरातील धक्कादायक घटना

याप्रकरणामुळे निवासी इमारतीतील पाळीव कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. एकीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असताना अशाप्रकारे पाळीव कुत्रेही नागरिकांचा चावा घेत असतील, तर त्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. भटक्या कुत्र्यांचा बंदोस्त करण्यात प्रशासनाकडून हलर्गर्जीपणा केला जातो. त्यामुळे पाळीव कुत्र्याचं काय? हा खरा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळवी कुत्र्यांना नेताना मालकानंही खबरदारी घ्यायला हवी. ज्यामुळे भटक्या कुत्र्यांचा आणि पाळीव प्राण्यांचा उपद्रव कमी होऊ शकतो, हे निश्चित.

Dog Attack
Maharashtra Politics : शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, सांगलीचा शिलेदार साथ सोडणार, उदय सामंतांनी दिले संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com