Viral Video: कमाल! बसमध्ये जागा नसल्याने तरुणानं केला भन्नाट जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत

Viral Bus Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका बसमधून प्रवाशाचा आहे. ज्यात तम्ही पाहू शकता नक्की काय घडले आहे.
Viral Bus Video
Viral VideoSaam Tv
Published On

Deshi Jugad Viral Video: सोशल मीडियावर बरेच गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात.काही व्हायरल व्हिडिओ इतके भारी असतात की ते पाहून प्रत्येकजण हसून लोटपोट होतो.त्यातच पुन्हा एका असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये बसमध्ये झोपण्यासाठी एका पठ्ठ्याने जी जागा निवडली आहे,ते पाहून प्रत्येकजण अवाक् झालेले आहे.जो व्हिडिओ चांगलाच व्हायरलही होत आहे.

भारतातील लाखोंच्या संंख्येने प्रवासी बसचा वापर प्रवासासाठी करत असतात.बसमधील हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर यापूर्वी पाहिले आहेत तर कधी बसच्या सीटसाठी जागा पकडताना निवडलेले हटके जुगाड पाहिले आहे तर मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत (Video)एका व्यक्तीने बसमध्ये झोपण्यासाठी अनोखी जागा निवडलेली आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने डोक्याला हात लावलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला बसमधून अनेक प्रवाशी प्रवास करत आहेत.काही जण सीट न मिळाल्याने बसमध्ये उभे आहेत तर बरेचजण सीटवर बसलेले आहेत.अशातच तुम्हाला बसमध्ये बॅग ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर एक व्यक्ती झोपलेला दिसत आहे.हाच तो व्यक्ती ज्याने झोपण्यासाठी थेट ती जागा निवडलेली आहे.सर्व मजेशीर प्रकार बसमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''कुठून येतात अशी लोकं'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,'या व्यक्तीला एखादा पुरस्कार द्या''असा मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: बसमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Bus Video
Viral Video: फोन कानाला, चिमुकला कडेवर... आई कचरा फेकायला गेली, पण जे केलं ते पाहून राग येईल, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com