
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेकजण प्रियकर किंवा प्रेयसीला प्रपोज करत असतात. एक आठवडा आपल्या प्रिय व्यक्तीला खूश करण्यासाठी प्रेमी वेगवेगळ्या दिवशी गिफ्ट देत त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. पण यादरम्यान काहींना प्रेम मिळतं, तर काहींच्या पदरी मात्र निराशा येते. 'प्रपोझ डे' चा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक मुलगा मुलीला प्रपोज करतो. नकरा मिळताच तो तिला मारहाण करतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील गजरोला पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. येथील एका तरुणाने एका तरुणीला प्रपोज केलं. तरुणीने नकार देताच त्याने तिला कानाखाली लगावली. यानंतर त्याने तिच्यासाठी आणलेली मिठाई तिच्या अंगावर फेकून दिली. हे पाहिल्यानंतर नेटकरी संतापलेत. सोशल मीडियावर तरुणाविरोधात कडक कारवाईची मागणी केली जातेय.
व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात की, एक तरुण आपल्या मित्रांसोबत आहे. तो एका कारजवळ उभा आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र आहे, कारमधील त्यांचे मित्र आहेत. त्यावेळी तो मिठाईच्या बॉक्समधून मिठाई काढतो. मित्राला देतो. त्यानंतर मुलीला प्रपोज करतो त्यानंतर तिला मिठाई देतो, पण जेव्हा ती मुलगी नकार देते तेव्हा त्या मुलाला राग येतो आणि तो तिच्या अंगावर मिठाई फेकतो.
मिठाईचा डबाही तरुणीच्या अंगावर फेकतो. तिला शिवीगाळ करतो. यावेळी त्याच्यासह असणारे त्याचे मित्र ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. तरुण मुलीला मारहाण करत असताना इतर मित्र त्याला अडवत नाहीत. उलट तिला मारहाण होत असल्याचं रेकॉर्ड करत असतात. विशेष म्हणजे आरोपीने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. यामुळे लोक संतापले असून कडक कारवाईची मागणी करताहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी नाराज झालेत. कडक कारवाईची मागणी करत आहेत. "मुलीने नाही म्हटलं म्हणजे तिला मारण्याचा हक्का मिळतो का? असा सवाल करत ही गैरवर्तवणूक सहन केली जाऊ शकत नाही". असं म्हटलंय. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे, जेणेकरुन ते पुन्हा असं करणार नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशा घटना रोखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.