Noida Viral Video: मित्रच उठले जीवावर; पाचजणांनी पकडून तरूणाला होळीच्या आगीत फेकलं, घटनेचा VIDEO समोर

Friend Threw Boy In Holika Dahan: होळीच्या आगीत मित्राला फेकल्याची घटना नोएडामध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Noida Viral Video
Noida Viral VideoSaam Tv

Boy Burnt Viral Video

नोएडामध्ये होळीच्या आगीत (Holika Dahan) मित्राला फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये दिसतंय की या मुलाला त्याच्या पाच मित्रांनी उचलले (Friend Threw Boy In Holika Dahan) आणि होळीच्या जळत्या निखाऱ्यावर फेकले. त्यानंतर हा मुलगा कसाबसा जीव वाचवत त्या आगीतून बाहेर पडल्याचं दिसतंय. (latest viral news)

नोएडातील बिसरख पोलीस स्टेशन परिसरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही मुले त्यांच्या एका मित्राला होलिका दहनात फेकताना दिसत आहेत. या धक्कादायक (Boy In Holika Dahan Boy) घटनेमध्ये या मुलाचे दोन्ही पाय भाजले आहेत. तो गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोएडा पोलिसांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गौर सिटी गॅलेक्सी वनमध्ये घडली आहे. पोलिसांना तपासात आढळून आलं की, हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत (CCTV Viral) होता. खेळत असताना तो होलिका (holi) दहनानंतर उरलेल्या राखेत पडला. त्याला कुणीही पाडलेलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

होळीच्या आगीत मित्राला फेकल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. या तरूणाला मित्रांनी (viral) चेष्ठेमध्ये आगीत फेकलं की जाणूनबुजून फेकलं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु मुलगा आगीत जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही पाय भाजले आहेत.

Noida Viral Video
Chain Snatching Viral Video: रील बनवणं पडलं महागात; चोराने भररस्त्यात ओढली महिलेच्या गळ्यातील साखळी, VIDEO व्हायरल

होळीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर येतात. पोलीस या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन सातत्याने करत असतात. तरीही मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं समोर (viral video) येतात. अशीच एक घटना आता नोएडामधून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (viral news) आहे.

Noida Viral Video
Viral Video: बटाटेवड्याला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आलाय गुलाबजामुन वडा; VIDEO पाहून रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com