रेल्वेमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना घडली आहे. भांडणाचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय. चक्क रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत या भांडणावर प्रतिक्रिया (Viral Video) दिली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन प्रवासी एकमेकांसोबत सामान ठेवण्याच्या जागेवरून वाद घालताना दिसत आहेत. आपण नक्की प्रकरण काय आहे, ते सविस्तर पाहू या. (latest viral news)
रेल्वेमध्ये एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत प्रवास करताना दिसत असतो. त्या मद्यधुंद व्यक्तीला आपल्या कुटुंबाबरोबर प्रवास करणारा दुसरा प्रवासी त्याच्या सीटवर बसण्यास नकार (Viral) देतो. तो त्या प्रवाशाला तुझं सामान इथून घेऊन जा अन्यथा खिडकीबाहेर फेकून देईन, असं सांगताना दिसत आहे. यावरून त्या दोघांमध्ये तुंबळ भांडण झालं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडीओमध्ये दिसतंच की, सामान ठेवण्यास नकार दिल्यावर मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती भांडण करण्यास सुरुवात करते. लहान मुलं आणि स्त्रिया बसलेल्या आहेत, या ठिकाणी बसणं बरोबर नाही, (Viral Video News) असं दुसरा प्रवासी वारंवार सांगत आहे. पण, मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती दुसरीकडे बसायला नकार देत आहे. त्यामुळे त्यांच्यातील वाद अजून टोकाला जाताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Crabbed_monk या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांचे सहप्रवाशांनी भांडण न थांबवता, त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. व्हिडिओ (Railway Passenger Fight Video) पाहून भांडणाची दखल थेट रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
रेल्वेने तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “कृपया तुमचा पीएनआर क्रमांक आणि मोबाईल नंबर थेट मेसेज (DM)द्वारे शेअर करा. जेणेकरून आम्हाला लवकर कारवाई करता (Fight Video) येईल. किंवा railmadad.indianrailways.gov.in वर तुमची समस्या मांडू शकता. जलद संपर्क साधण्यासाठी १३९ क्रमांक डायल करू शकता.
दररोज लाखो लोक रेल्वेमधून (Indian Railway) प्रवास करत असतात. रेल्वेतील भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर होत असतात.अनेक लोकं या भांडणांची मजा घेताना दिसतात. असाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये सामान ठेवण्याच्या जागेवरून प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.