Viral Video: रिक्षाचालकाचा देशी जुगाड! पाईप वापरुन थेट रिक्षात बनवला AC; पाहा व्हिडिओ

Deshi Jugaad Viral Video: उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही उपाय करताना दिसून येतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Viral Video
Viral Videosaam digital
Published On

Auto Rikshw Rikshaw Jugaad Video

सध्या राज्यभरात कडक उन्हाचे तडाके जाणवायला सुरुवात झाली आहे. रस्तोरस्ती आपल्याला शीतपेयाचे दुकान पाहायल मिळतात. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही उपाय करताना दिसून येतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका ऑटो रिक्षा(Rickshaw) चालकाने उन्हाच्या गरम वाऱ्यापासून वाचण्यासाठी चक्क अनोखा जुगाड शोधून काढलाय.

Viral Video
Viral Video: बटाटेवड्याला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आलाय गुलाबजामुन वडा; VIDEO पाहून रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

आपण अनेकदा ऑटो रिक्षामध्ये प्रवाशांच्या सोईसाठी अनेक वेगवेगळे उपाय असलेले पाहतो. प्रवाशांचा प्रवास सोईस्कर व्हावा यासाठी वाहन चालक यासाठी अनेक त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये अनेक जुगाड करताना दिसून येतात त्यात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची नेटकरी वर्गात तूफान चर्चा होतेय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर अनेक वाहने उभी आहेत.त्यातच या रस्त्यावर एक रिक्षाही आहे. यात वेगळेपण म्हणजे रिक्षाच्या वाहनचालकाच्या तिथे एक पाईप लावण्यात आली आहे. खर तर नीट पाहिल्यावर समजते की उन्हाच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी रिक्षाला तशी पाईप लावण्यात आली आहे. या पाईपचा अर्धा भाग रिक्षामध्ये आहे तर अर्धा भाग रिक्षाच्या बाहेरच्या बाजूला आहे. जेव्हा रिक्षा जोरात धावेल तेव्हा पाईपद्वारे दुसऱ्या बाजून थंड हवा रिक्षाच्या आत बसलेल्या प्रवाशांना आणि वाहनचालकाला थंडावा देईल.

व्हिडिओ व्हायरल होताच रिक्षाचालकाचे कौतुक करण्यात येत असून अनेकांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. व्हिडिओ तामिळनाडूमधील असून @sangeeramexया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

Viral Video
Rishabh Pant Video Viral: ऋषभ पंतची 'झक्कास' स्टम्पिंग पाहिली का? दिसली धोनीची झलक; क्रिकेट चाहते अवाक!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com