Viral Video: बटाटेवड्याला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आलाय गुलाबजामुन वडा; VIDEO पाहून रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Gulab Jamun Wada Video viral: गुलाबजामुन आणि वडापाव प्रेमींसाठी खुशखबर आहे. कारण मार्केटमध्ये आता गुलाबजामुन वडा आला आहे. याचा व्हिडिओ नेटवर तुफान व्हायरल होत आहे.
Gulab Jamun Wada
Gulab Jamun Wada Saam Tv

How To Make Gulab Jamun Wada Video viral

वडापाव सगळ्यांनाच आवडतो. महाराष्ट्रामध्ये गुलाबजामून प्रेमींची देखील संख्या मोठी आहे. गुलाबजामुन आणि वडापाव प्रेमींसाठी खुशखबर आहे. कारण मार्केटमध्ये आता गुलाबजामुन वडा (Gulab Jamun Wada) आला आहे. याचा व्हिडिओ नेटवर तुफान व्हायरल होत आहे. वडापाव कसा तयार केला जातो, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु काय तुम्हाला गुलाबजामुन वड्याची रेसिपी माहित आहे का?  (latest viral news)

साधारणपणे वडा तयार करण्यासाठी बटाट्याची सुकी भाजी करतात. तिचे गोल गोळे तयार करून त्यांना बेसनमध्ये मिक्स करून तेलामध्ये तळलं जातं. खरं तर ही क्लासिक रेसिपी (Gulab Jamun Wada Video viral) आहे.ही रेसिपी मागील अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. या रेसिपीतून तयार होणारा वडा जगभर मोठ्या आवडीने खाल्ला जातो. पण आपल्याकडे टॅलेंटेड लोकांची कमी नाहीये. अशाच एका पठ्ठ्याने आता गुलाबजामुन वडा तयार केला (Gulab Jamun Wada recipe ) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रयोगशील विक्रेत्याने ही नवीन रेसिपी शोधून काढली आहे. त्याने गुलाबजाम बेसनमध्ये मिक्स केले. त्यांना तेलात तळून काढलं.तयार झालेल्या या अतरंगी डिशला त्याने गुलाबजामुन वडा असं नाव दिला आहेत. अनेकजण आता या डिशला गुलाबजामुन भजी देखील म्हणत आहेत. तुम्हाला ही रेसिपी करून पाहायला आवडेल का? खरं तर या डिशची चव कशी (Gulab Jamun Wada Video) असेल, हा देखील प्रश्न आता पडत आहे.

स्ट्रीट फूडच्या नावाखाली अलीकडे विविध अतरंगी प्रयोग केल्याचं पाहायला मिळत आहेत. कुणी मॅगीची भजी बनवतंय तर कोण फ्रुटवाला चहा बनवत आहे. अलीकडे तर बिस्किटांचं ऑमलेट (viral) आणि अंड्यापासून तयार केलेली पाणी पुरी देखील सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाली होती. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे गुलाबजामून वडा.

Gulab Jamun Wada
Viral Video: वा रे पठ्ठ्या! कार पार्किंगसाठी लढवली शक्कल; भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले,पाहा Video

आता बाजारात बटाटेवड्याला टक्कर देण्यासाठी गुलाबजामून वडा समोर आला (viral video) आहे. खरोखरच हा वडा चक्क गुलाबजामपासून तयार केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे. खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंना मजेशीर प्रतिसाद मिळत असल्याचंही दिसून (viral news) येतंय.

Gulab Jamun Wada
Viral Video : संतापलेला चिमुकला कुत्र्याला करकचून चावला; व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com