Viral Video : संतापलेला चिमुकला कुत्र्याला करकचून चावला; व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

Boy Bit The Dog : थेट कुत्र्याची मान आपल्या छोट्याशां हाताने घट्ट पकडतो. आणि कुत्र्याच्या डोक्याला कडकडून चावा घेतो. सदर घटना तेथे असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video :

एखाद्या कुत्र्याने व्यक्तीवर हल्ला केल्याच्या आजवर तुम्ही अनेक घटना पाहिल्या असतील. कुत्र्यांच्या हल्ल्यात काहीवेळा व्यक्तींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशात सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकल्या मुलाने थेट कुत्र्याला चावा घेतला आहे.

Viral Video
Viral video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; तरुणाला नॉन स्टॉप चापटवलं, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,साधारण २ ते ३ वर्षांचा एक लहान मुलगा कार शेजारी उभा आहे. उंची कमी असल्याने पायाच्या तळव्यावर उभा राहून तो त्याची बॅग खाली घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे करताना तेथे एक काळ्या रंगाचा कुत्रा येतो. कुत्रा चिमुकल्या मुलाच्या पोटाला चावा घेतो. आपल्याला चावल्याचं समजताच दुसरं एखादं बाळ असतं तर रडलं असतं. मात्र या चिमुकल्याने जे काही केलंय त्याने सारेच थक्क झालेत.

मला चावलास काय? थांब आता मी पण तुला चावणार असं म्हणत चिमुकला मुलगा थेट कुत्र्याची मान आपल्या छोट्याशा हाताने घट्ट पकडतो आणि कुत्र्याच्या डोक्याला कडकडून चावा घेतो. सदर घटना तेथे असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. व्हिडिओ @chandpurofficial या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सदर घटना बिजनौर येथील असल्याचं समजलं आहे. कारण व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये बदला घेताना बिजनौरचा मुलगा असं लिहिण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओपाहून यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी मुलाचं कौतुक केलंय तर काहींनी यावर टीका केली आहे. लहान मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवले पाहिजे, असं एकाने लिहिलं आहे.

मुलगा कुत्र्याला चावत असताना कुत्र्याने पुन्हा मुलाच्या तोंडाचा चावा घेतला असता तर? लहान मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी आपल्या मुलांचा जीव धोक्यात टाकू नका, अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.

Viral Video
Sidhu Moosewala's Brother: टाईम्स स्क्वेअरवर ज्युनियर सिद्धू मूसेवाला झळकला, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव; पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com