Canary Islands : अजबच नियम! समुद्रकिनाऱ्यावरील दगड उचलल्यावर भरावा लागतो २ लाखांचा दंड

Canary Islands Latest News : अशाच एका देशातील नियमाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या देशात समुद्र किनाऱ्यावरील वाळू किंवा दगड घरी नेल्यास दोन लाखापर्यंत दंड आकारला जातो.
Canary Islands
Canary Islands YANDEX

Canary Islands Fines Tourists For Picking Rocks :

जगातील प्रत्येक देश त्यांच्या सोयीनुसार पर्यटकांसाठी नियम तयार करत असतो. काही देशातील नियम त्यांच्या नागरिकांसाठी सामान्य वाटतात. मात्र, दुसऱ्या देशातून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी अजब वाटतात. अशाच एका देशातील नियमाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या देशात समुद्र किनाऱ्यावरील वाळू किंवा दगड घरी नेल्यास दोन लाखापर्यंत दंड आकारला जातो. (Latest Marathi News)

कॅनरी बेटावरील लॅनजारोट आणि फ्यूरटेवेंटुरा येथे जाणाऱ्या पर्यंटकांना समुद्र किनाऱ्यांवरून वाळू, दगड घेऊन जाणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. तसेच किनाऱ्यावरून वाळू, दगड घेऊन जाणाऱ्यांच्या विरोधात दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

Canary Islands
Amazon Seller : Amazon वरून खरेदी पडू शकते महागात; काय आहे कारण? जाणून घ्या

'द न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्ता नुसार, समुद्र किनाऱ्यावरून वाळू किंवा दगड घेऊन जाणाऱ्यांना १२८ पाऊंड (१३, ४७८ रुपये) ते २५६३ (२,६९,८७९ रुपये) इतका दंड आकारण्याची तरतूद आहे. पॉपकॉर्नच्या आकाराचा दगड घेऊन जाणाऱ्यांना कमी दंड आहे. तर मोठ्या प्रमाणात दगड घेऊन जाणाऱ्यांना सर्वाधिक दंड आकारला जातो.

पर्यटक घेऊन जातात किनाऱ्यावरील वाळू आणि दगड

समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेले पर्यटक हे किनाऱ्यावरून दगड आणि वाळूही सोबत घेऊन जातात. यामुळे पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होतो. रिपोर्टनुसार, पर्यटकांनी किनाऱ्यावरील वाळू आणि दगड घेऊन गेल्याने दर वर्षी लॅजारोट समुद्र किनाऱ्यावरील एक टन वॉल्केनिक मॅटीरिअल नाहीसे होत आहे.

बिघडत आहे पर्यावरणाचा समतोल

फ्यूरटेवेंटुरामधील पॉपकॉर्न समुद्रकिनारा नावाने प्रसिद्ध असलेल्या किनाऱ्यावरून प्रत्येक महिन्याला एक टन वाळू गायब होते. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 'यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. समुद्र किनाऱ्यावर धोका निर्माण होत आहे. पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होत आहे. यामुळे या किनाऱ्यावरून वाळू आणि दगड घेऊन जाणाऱ्या पर्यटकांकडून दंडाची वसुली केली जात आहे.

Canary Islands
Suryakumar Yadav Heartbreak Story: सूर्यकुमार यादवचा पुन्हा एकदा हार्टब्रेक! नेमकं कारण काय? जाणून घ्या

दरम्यान, कॅनरी आयलँड हे सात मुख्य बेटांनी तयार झालं आहे. यात टेनेरायफ, ग्रान कॅनेरिया, लँजारोट, फ्यूर्टेवेंटुरा, ला पालमा, ला गोमेरा आणि एल हिएरो या बेटांचा समावेश आहे. प्रत्येक बेटांची स्वत:ची एक ओळख आहे.

दरम्यान, टेनरिफमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे अलीकडेच

'वॉटर इमर्जन्सी' लागू करण्यात आली होती. अनेक अधिकाऱ्यांनी निसर्गातील संसाधणे कमी होण्याला पर्यटकांनी दोषी ठरवलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या तुलनेत इतर देशातील पर्यटक चार पट उपयोग करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com