तुम्हीही Amazon वरून खरेदी करत असाल तर येत्या काही दिवसांत तुम्हाला महागात पडू शकते. Amazon ने विक्रेत्यांकडून घेतले जाणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच काही वस्तूंच्या वितरण शुल्कात बदल केला आहे. अंतिमत: त्याचा फटका येत्या काळात ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. मात्र Amazon ने कोणत्या शुल्कात बदल केले आहेत, त्याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही.
Amazon एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. त्यामुळेच अनेक विक्रेते वस्तुंची त्यावर विक्री करत असतात. त्या बदल्यात, Amazon त्या विक्रेत्यांकडून काही शुल्क वसूल करते आणि त्यांना स्टॉकिंगपासून ते वितरणापर्यंत सेवा पुरवते. तथापि, विक्रेते हे शुल्क त्यांच्या मार्जिनमध्ये जोडतात आणि शेवटी ते ग्राहकांकडून वसूल करतात. ॲमेझॉनचे म्हणणे आहे की शुल्कामध्ये केलेले बदल महागाई आणि व्याजदराशी सुसंगत आहेत. तसेच इंडस्ट्रितील प्रचलित शुल्कानुसार बदललेले गेले आहेत.
ॲमेझॉनने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी 7 एप्रिलपासून आपल्या विक्रेता शुल्कात बदल करणार आहे. अशा परिस्थितीत, 'Amazon.in' वर नोंदणीकृत सर्व विक्रेत्यांना नवीन शुल्कानुसार बिल दिले जाईल.
आतापासून रेफरल फी, क्लोजिंग फी आणि वेट हँडलिंग फीमध्ये बदल होणार आहे. आतापासून, सरासरी 1,000 रुपये किंवा त्याहून अधिक ऑर्डरसाठी क्लोजिंग फी 3 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, चलनवाढीच्या अनुषंगाने हाताळणी आणि डिलिव्हरी खर्चात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय वजन हँडलींग शुल्कातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आता ॲमेझॉनवर कपडे, बेडशीट, कुशन कव्हर्स आणि भांडी यांसारख्या श्रेणींसाठी रेफरल फी कमी केली जाईल. तर वैज्ञानिक वस्तुंचं शुल्क वाढवण्यात येणार आहे. एवढेच नाही तर कंपनीने जीरो फीस फुलफिलमेंट धोरणही संपुष्टात आणले आहे. अशा परिस्थितीत आता 20,000 रुपयांहून अधिकच्या ऑर्डरवर वजन आणि वितरण शुल्क भरावे लागणार आहे. हे 30 एप्रिल 2024 पासून लागू होईल. त्याचवेळी, प्रत्येक शुल्कावर 18 टक्के दराने जीएसटी भरावा लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.