Jio vs Airtel vs VI: आयपीएलचे सामने पाहायचे आहेत? हे स्वस्त रिचार्ज करून घ्या IPL ची मजा, जाणून घ्या ऑफर

IPL 2024 Recharge: शुक्रवारपासून आयपीएलच्या १७ हंगामाला सुरूवात झालीय. पहिला सामना आरसीबी आणि सीएसकेच्या संघात झाला.परंतु अनेकांना हा सामना पाहता आला नाही.क्रिकेट प्रेमींनो काळजी नको, आयपीएलचे सामने पाहण्याचा आनंद तुम्हालाही मिळावा यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आकर्षक रिचार्ज प्लान आणले आहेत.
IPL 2024 Recharge
IPL 2024 Rechargeyandex

Best Rechagre Plans for IPL:

आयपीएलच्या १७ व्या हंगामाची सुरूवात झालीये.या हंगामातील पहिला सामना अनेकांना पाहता आला नाहीये. आयपीएल स्ट्रीमिग होत असलेले अ‍ॅप अनेकांकडे नसल्यामुळे हा सामना पाहता आला नाहीये. हीच बाब ओळखत टेलिकॉम कंपन्यांनी क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आणलीय.या टेलिकॉम कंपन्यांनी नवीन रिचार्ज प्लान आणले आहेत,ज्यामुळे क्रिकेट प्रेमी आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकतील. (Latest News)

जर तुम्हाला आयपीएलच्या १७ व्या हंगामातील सामने पाहण्यासाठी लाइव्ह स्ट्रीमिगसाठी २ महिन्यांचा चांगला प्रीपेड प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि व्ही आय म्हणजेच वोडाफोन-आयडिया प्रीपेड प्लान आणत आहेत. जर तुम्ही हे प्लान घेतले तर तुम्हाला तुमचा डेटा संपण्याचा चिंता करावी लागणार नाही.

म्हणजेच काय आयपीएलचे सामने पाहण्याचा आनंदात कोणतेच विरज पडणार नाही. काही वर्षापूर्वी आयपीएलचे सामने पाहण्यासाठी युझर्सला डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन घ्यावे लागते होते.त्याता युझर्सचा डेटा देखील मोठ्या प्रमाणात खर्च होत होता.परंतु आता या टेलिकॉम कंपन्यांनी आणलेल्या नव्या प्लानमुळे युझर्सला अशा कोणत्याच प्रकारचा रिचार्ज करावा लागणार नाही. सामने पाहताना कोणालच स्लो स्ट्रीमिगचा अनुभव मिळणार नाही. इंटरनेट स्पीड चांगल्या प्रकारे चालू राहील.

जिओचा आयपीएल प्लान

Jio कंपनीने IPL 2024 साठी एक दिवसाची वैधता असलेली योजना लॉन्च केली आहे, ज्यासाठी वापरकर्त्यांकडे सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. जिओच्या या वन डे प्लानची किंमत49 रुपये आहे. याची वैधता एक दिवसाची आहे आणि यामध्ये यूजर्सना 25GB डेटा मिळेल.

जिओचा दुसरा IPL प्लान 222 रुपयांचा आहे. या प्लॅनची ​​वैधता वापरकर्त्यांच्या विद्यमान बेस प्लॅन इतक्याच दिवसांसाठी असेल. या प्लानमध्ये यूजर्सना 50GB इंटरनेट डेटा मिळेल.जिओच्या तिसऱ्या आयपीएल प्लॅनची ​​किंमत 749 रुपये आहे. या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळेल. म्हणजेच यूजर्सना एकूण 180GB डेटा मिळेल. या व्यतिरिक्त युझर्सला या प्लॅनमध्ये 20GB चा अतिरिक्त डेटा देखील दिला जाईल, जो ते दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरू शकतील.

म्हणजेच या प्लानमध्ये यूजर्सना एकूण 50 GB इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल दररोज 100 एसएमएस, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शन दिले जाईल.

एअरटेल आयपीएल प्लान

एअरटेलने खासकरून आयपीएल 2024 साठी काही नवीन प्लान आणले आहेत. यातील पहिला प्लानची माहिती घेऊ. एअरटेलच्या प्लॅनची ​​किंमत 39 रुपये आहे, हा एका दिवसासाठी वैध असणारा आहे. या प्लानमध्ये युझर्सला 20GB FUP सह अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळेल. यापूर्वी या प्लानची किंमत 49 रुपये होती, परंतु कंपनीने आयपीएलसाठी त्याची किंमत 10 रुपयांनी कमी केलीय.

एअरटेलचा दुसरा प्लॅन 79 रुपयांचा आहे, याची किंमत आधी 99 रुपये होती. पण आयपीएलमुळे याची किंमत 20 रुपयांनी कमी करण्यात आलीय. या प्लॅनमध्ये देखील युझर्सला 20GB FUP सह अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळेल परंतु या प्लॅनची ​​वैधता 2 दिवस असेल. याशिवाय Airtel ने IPL ब्रॉडकास्टिंगसाठी Star Sports सोबत देखील भागीदारी केलीय. त्यामुळे Airtel युझर्स Airtel Digital TV वर 4K रिझोल्युशनमध्ये IPL सामने देखील पाहू शकतात.

व्होडाफोन-आयडिया आयपीएल प्लान

Vodafone-Idea म्हणजेच व्हीआय कंपनीला भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये खूप फटका बसलाय. पण तरीही या कंपनीने आपल्या ग्राहकांना IPL चा आनंद देण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत. आयडिया- व्होडाफोन कंपनीचा पहिला आयपीएल प्लान 1,449रुपयांचा आहे. या प्लानमध्ये युझर्स 180 दिवस हा प्लानचा लाभ घेऊ शकणार आहेत. युझर्सला दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा आणि व्हीआय अॅपवर 30 GB अतिरिक्त डेटा मिळेल.

IPL 2024 Recharge
Maruti Suzuki Compact Cars: कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मारुती लवकरच आणणार ३ दमदार कार, पहा यादी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com