अबब! लग्न समारंभात वधूवर ८ कोटी रुपयांची रोकड उधळली? व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय?

8 Crore Showered on Bride : तुम्ही लग्नसमारंभात लोक पैसे उधळत असल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण एका पंजाबी लग्नाचा व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झालेत
8 Crore Showered on Bride :
A viral wedding video showing a massive cash shower sparks debate, but the truth behind the ₹8 crore claim is different.saam tv
Published On
Summary
  • लग्नातील ८ कोटी उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • प्रत्यक्षात दावा अतिशयोक्त किंवा दिशाभूल करणारा

  • फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर आलं

लग्नसमारंभात पैसे उधळणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण कल्पना करा, जर कोणी आपल्या लग्नात ८ कोटी रुपये ओवाळणी दिली किंवा उधळले तर? थक्क झालात ना? होणारच आता आकडाच इतका मोठा की पैसे मोजता मोजता दम लागायचा. सध्या सोशल मीडियावर एका पंजाबी लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एका जोडप्यावर नोटांचा वर्षाव केला जातोय. नवरदेवाने वधूवर रोख ८ कोटींहून अधिक रुपये उधळलेत. या फोटो मागील सत्य जाणून घेऊया.

काय आहे व्हायरल व्हिडिओ

एका पंजाबी लग्न समारंभाचा हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यातील आहे. यात नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी वधूवर नोटांचा वर्षाव करत आहेत. नवरदेवासह वऱ्हाडी मंडळीसुद्दा नवरीवर पैसे उधळत आहेत. या लग्नात किमान ८ कोटी रुपयांची उधळण झाल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ पाहून युझर्स थक्क झालेत.

व्हिडिओची वास्तविकता वेगळीच

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सने प्रतिक्रिया दिली आहे. हा लग्न सोहळा म्हणजे पैसे वाल्याची पार्टीच वाटत आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओवर नवरदेवाच्या भाऊने प्रतिक्रिया व्हायरल दिलीय. नवरदेवाचा भाऊ सिकंदर सिंग याने सांगितलं की लग्नात पैशांचा वर्षाव करण्यात आला होता, पण उधळण्यात आलेले पैसे ८ कोटी नव्हते.

माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये ट्रकचा व्यवसाय करतो. लग्न १४ फेब्रुवारीला झाले आहे. लग्नात खूप खर्च झाला. दरम्यान वधूवर उधळण्यात आलेल्या पैशांची किंमत ८ कोटी नव्हे तर फक्त सुमारे २ लाख रुपये होते. सोशल मीडियावर या रक्कमेचा आकडा फुगवून सांगण्यात आला आहे, जो की खोटा आहे. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या इव्हेंट मॅनेजर आणि डीजे यांनीही ₹८ कोटींचा व्हायरल दावा फेटाळून लावला आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, काही डॉलरच्या नोटांसहित एकूण रोकड अंदाजे ४००,००० रुपये होती. एक कोटी रुपयांचा आकडा कसा समोर आला आणि इतका व्हायरल कसा झाला याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती, असेही त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com