Fact Check: झिपलाईन बनली डेथलाईन? झिपलाईन तुटून महिला दरीत कोसळली?

Zipline Accident Video Viral: झिपलाइन तुटल्याने एक महिला दरीत पडून तिचा मृत्यू झाला. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमागील सत्य जाणून घेऊ.
Zipline Accident Video Viral
FACT CHECK: DID A WOMAN FALL INTO A VALLEY AFTER A ZIPLINE SNAPPED?saam tv
Published On

नमस्कार मी शिवाजी शिंदे, व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत.आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. झिपलायनिंग करताना मोठी दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात आलाय.दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. पण, खरंच झिपलाईन जीवघेणी ठरलीय का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Zipline Accident Video Viral
Jalgaon : रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, जमिनीवर पडलेला वडापाव पुन्हा विकला, VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.आता बघा, ही महिला झिपलायनिंग करत असतानाच अचानक झिपलाईन तुटली आणि ही महिला खोल दरीत कोसळलीय. झिपलाईन तुटल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील असल्याचा दावा केलाय. पण, खरंच झिपलाईन तुटून दुर्घटना घडलीय का? कारण, अनेक जण फिरायला गेल्यावर झिपलायनिंग सारखा साहसी खेळ खेळतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

झिपलायनिंग हा साहसी खेळ आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या उंचीवरील ठिकाणांना एक मजबूत स्टील केबल घट्ट बांधलेली असते. या तारेवर घसरण्यासाठी एका ट्रॉली किंवा पुल्लीचा वापर केला जातो. आणि याच ट्रॉलीचा वापर करून ही महिला झिपलायनिंगचा आनंद घेत होती. अर्ध्यावर गेल्यानंतर झिपलाईन तुटली आणि ही महिला दरीत कोसळली. तिच्या सुरक्षेसाठी असलेली दोरीही तुटल्याने तिला वाचवण्यात अपयश आल्याचा दावा केलाय.

Zipline Accident Video Viral
Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

पण, खरंच ही दुर्घटना उत्तराखंडमध्ये घडलीय का? हा विषय पर्यटकांसाठी महत्त्वाचा आहे. बरेचजण फिरायला जातात त्यावेळी साहसी खेळ खेळतात. त्यामुळे याची आम्ही पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

झिपलाईन तुटून दुर्घटना घडलेली नाही

दुर्घटनेचा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित

व्हिडिओ बनवणाऱ्याचा शोध घेतला जातोय

उत्तराखंड पोलिसांकडून कारवाईचा इशारा

सगळ्याचे राईड या जीवघेण्या नसतात. पर्यटक आनंद घेण्यासाठी असे धाडसी खेळ खेळत असतात. मात्र, कुणीतरी हा AI व्हिडिओ बनवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला. पण, आमच्या पडताळणीत झिपलाईन तुटून महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com