Viral Video : ऑन ड्युटी पोलिसाचा हा व्हिडिओ बघून डोळे पाणावतील; दुचाकीवरच डबा ठेवला, उभं राहूनच केलं जेवण

Police Viral Video: सोशल मीडियावर पोलिसांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच ऑनड्युटी उभ्यानेच डबा खाणारा हा पोलिस कर्मचारी चर्चेत आलाय. पण या व्हिडीओवरुन अनेकांचा पोलिसांबाबतचा आदर प्रचंड वाढलाय.
Police Viral Video
Police Viral VideoSaam Digital
Published On

Police On Duty Viral Video

सोशल मीडियावर पोलिसांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतू पोलिसांची ड्युटी कशी असते, यावर वेगळं बोलायला नकोच.

दिवाळी असो, गणपती असो किंवा मग अगदी घरातला कोणताही सण. पोलिस नेहमीच ऑनड्युटी असतात. अशातच ऑनड्युटी उभ्यानेच डबा खाणारा हा पोलिस कर्मचारी चर्चेत आलाय. पण या व्हिडीओवरुन अनेकांचा पोलिसांबाबतचा आदर प्रचंड वाढलाय. या पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झालाय.

ऑन ड्युटी पोलिसाचा हा व्हिडिओ बघून डोळे पाणावतील; दुचाकीवरच डबा ठेवला, उभं राहूनच केलं जेवण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की,कर्तव्य बजावत असताना ब्रेक घेण्याऐवजी, एका ब्रीजच्या खाली पोलिस कर्मचाऱ्याने बुलेट पार्क केलीय. तिथेच त्याने जेवण करायला सुरुवात केली. आजुबाजूने वाहतूक सुरुय आहे. एक रिक्षाही तुम्ही व्हिडीओत रस्त्यावरुन जाताना पाहू शकताय. व्हायरल झालेल्या या पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ अनेकांना भावलाय.

Police Viral Video
Viral Video: सुसाट गाड्या, पैशांचा पाऊस अन् थरारक स्टंट... मस्ती महागात पडली; भरावा लागला लाखोंचा दंड| VIDEO

व्हायरल व्हिडिओहा @NashirCityPolice या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आपली शहरं सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक नायिकांना सलाम, असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला गेलाय.

तुम्ही काम करताना जेवणासाठी ब्रेक घेत असालच ना..? दोन मिनिटं बसून सुखाचे दोन घास पोटात ढकलत असालच ना..? पण ऑन ड्युटी बाईकवर डबा ठेवून लंच करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्याबद्दल तुमच्या मनात नेमकं काय आलं..? उभ्याने पाणीही पिऊ नये असं म्हणतात..! अशात ड्युटीवर असताना उभं राहून जेवण करण्याची वेळ पोलिसांवर नेमकी का येते? असं जेवणं करणं योग्य नाही म्हणून पोलिसाला दोष द्यायचा.. की वेळप्रसंगी उभ्याने जेवण करु पण कर्तव्यात कसूर होऊ देणार नाही, यासाठी कौतुक करायचं..?

व्हायरल व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात विविध सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्सही केले जात आहेत. व्हिडिओ पाहून या पोलिस कर्मचाऱ्याबद्दलचा आदर अनेक पटीने वाढल आहे.

Police Viral Video
Viral Video: शीला की जवानीवर तरूणींचा धावत्या ट्रेनमध्ये भन्नाट डान्स, धिंगाना पाहून प्रवाशांचा फूल टाईमपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com