रॉयल एन्फिल्ड कंपनी बाईकच्या आधुनिक लूकसाठी प्रसिद्ध आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवीन बाईक लाँच करत असते. कंपनीने नुकतीच रॉयल एन्फिल्ड हिमालयन 450 लाँच केली आहे. याचसोबत कंपनीने शॉर्टगन 650 लाँच केली आहे. शॉर्टगन 650 ची स्पेशल एडिशन लाँच करण्यात आली आहे.
एका रिपोर्टनुसार, Royal Enfield Shortgun 650 Motoverse Edition फक्त मोजकेच लोक खरेदी करु शकतात. या बाईकच्या २५ युनिट्स विकल्या जाणार आहेत. हे ग्राहक लकी ड्रॉद्वारे ठरवले जाणार आहेत.
Shortgun 650 Motoverse Edition
Shortgun 650 Motoverse Edition मध्ये नवीन रंग वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाईक खूपच वेगळी आहे. या बाईकवरील रंगकाम हातांनी केले आहे.
किंमत
या नवीन बाईकमध्ये Royal Enfield Super Meteor 650 चे इंजिन वापरण्यात आले आहे. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आले आहेत. या इंजिनला शॉर्टगन 650 नुसार रिट्यून केले आहेत. या बाईकची किंमत 4.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त Shortgun 650 Motoverse Edition साठी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.