
Mumbai Local Train Shocking Video: मुंबई लोकल ही लाखो प्रवाशांचे दररोजचे जीवन आहे. विशेषत म्हणजे महिला प्रवाशांसाठी असलेल्या स्वतंत्र डब्यांमुळे त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळते असा विश्वास कायमचा आहे. मात्र, अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभ केलं आहे.
या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये एक तरुण महिला डब्यात उभा असून, त्याने पॅंटची झिप उघडून अश्लील वर्तन केल्याचं स्पष्ट दिसत आहे. आजूबाजूच्या महिलांनी त्याच्या वागण्याचा निषेध केला, तरीही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. हा प्रकार घडत असताना काही प्रवाशांनी धाडस दाखवत त्याचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार अत्यंत गंभीर असून, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सध्या हा व्हिडिओ एक्स अर्थात ट्वीटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वत्र पाहिला गेला आहे.
मुबंई (Mumbai Local) लोकलमध्ये घडलेल्या अशा विकृत वर्तनामुळे महिला प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईसारख्या प्रगत शहरात आणि लाखो महिलांनी वापरणाऱ्या लोकलमध्ये असे प्रकार घडणं ही खरोखरच लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित व्यक्तीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून आणि सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
टीप: मुबंई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.