Couple Viral Video: हायवेवर खुल्लमखुल्ला प्यार! दुचाकीच्या टाकीवर जोडप्याचा रोमान्स; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video: प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
Couple Viral Video
Couple Viral VideoSaamTV
Published On

Viral Video:

सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचा भररस्त्यात रोमांन्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. आपण कुठे आहोत काय करतोय याचं जराही भान या दोघांना नाहीये. हायवेवर स्पीडमध्ये दुचाकीवर एका तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारून बसले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर प्रवाशांसह नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. (Latest Marathi News)

Couple Viral Video
Ghaziabad Viral Video: महिलेने पोलीस अधिकाऱ्याला चपलेने चोपलं; कारण काय? धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

यांच्यामुळेच अपघात होतात

प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण हायवेवर तरुण दुचाकी चालवत असताना चित्रपटातील सिन प्रमाणे तरुणीने त्याला मिठी मारलीये. अशा तरुणांमुळे वाहन चालवताना त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष नसते, परिणामी अपघात होऊ शकतो.

उत्तर प्रदेशमधील हापूर येथे ही घटना घडली आहे. या हायवेवरून जाताना अनेक व्यक्तींनी जोडप्याचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला आणि उत्तप्रदेश पोलिसांना टॅग केला. पोलिसांनी यावर आता अॅक्शन घेताली असून जोडप्याचा शोध घेण्यात आलाय. तसेच अशा पद्धती भररस्त्यात रोमांन्स केल्याने पोलिसांनी जोडप्याला दंड ठोठावलाय. जोडप्याकडून ८,००० रुपये दंड स्वरुपात घेण्यात आलेत.

या आधी देखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन तसेच अन्य ठिकाणी प्रेमी युगुलांचे रोमान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशा प्रमे जोडप्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीये.

Couple Viral Video
Couple Viral Video: हायवेवर खुल्लमखुल्ला प्यार! दुचाकीच्या टाकीवर जोडप्याचा रोमान्स; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com