Washim CCTV Video: अनर्थ टळला! विजेच्या खांबाला हात लावताच चिमुकलीला झटका बसला अन्....

Washim Incident: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये एका चिमुकलीला विजेच्या खांबाचा जोरदार झटका बसला. सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली.
Washim Incident
Washim CCTV VideoSaam Tv
Published On

Cctv Viral Video: वाशिम जिल्ह्यात महावितरणाच्या ढसाळ कारभाराचा फटका एका मुलीच्या जीवावर बेतला असता. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचा जीव वाचण्याचा प्रकार वाशिमच्या अनसिंग इथं समोर आला आहे. सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे,

नेमके घडले काय?

विद्युत खांबाच्या तणावाला हात लावताच एका सात वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का बसला, शॉक लागताच मुलीचा किंचाळण्याचा आवाज आल्याने परिसरातील महिला जमा झाल्या तितक्यात त्या मुलीची आई लगेच धावत तिच्या जवळ गेली,काही क्षणांत मुलीला लगेच बाजूला केल्यामुळे चिमुकलीचा जीव(Life) वाचला आहे.

ही सर्व घटना सीसीटीव्ही(CCTV VIDEO) कॅमेरात कैद आहे. वाशिम जिल्ह्यात वीज वितरणच्या कारभार अनेक ठिकाणी ढेपाळल्यामुळे मागील काही दिवसात विद्युत खंडित राहत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यापूर्वीही असे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''लहान मुलांची कायम खुप काळजी घेतली पाहिजे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''नशीब चांगले होते'' तर तिसऱ्या यूजरने म्हटलं,''नशीब पाहिलं गेलं वेळेवर'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Washim Incident
Viral Video: दुर्दैवी घटना! घरासमोर पावसात खेळणाऱ्या चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू; हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com