Bus Viral Video: बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहाच, धावत्या बसमध्ये महिलेसोबत काय घडलं?

Viral Video: रोज असंख्य लोक बसने प्रवास करतात. बसने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांनी जीव धोक्यात घालून दाराला लटकून प्रवास केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, तुम्ही कधी बसमधूनच अचानक एक व्यक्ती रसत्यावर पडल्याचे पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Chennai Bus Viral Video:

रोज असंख्य लोक बसने प्रवास करतात. ऑफिसच्या वेळी आणि ऑफिस सुटण्याच्या वेळी बसला खूप जास्त गर्दी असते. तेव्हा अनेक लोक बसच्या दारावर लटकूनदेखील प्रवास करतात. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, बसमध्ये बसलेली एक व्यक्ती अचानक रस्त्यावर पडल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेलच ना. परंतु चैन्नईत एका बसमधून एक महिला रस्त्यावर पडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, चैन्नईतील एक धावत्या बसचा (फूटबोर्ड) अचानक तुटतो. त्यामुळे एक महिला खाली पडते. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याचे दिसत आहे. त्या बसच्या एका सीटखाली असलेली लोखंडी जागा (फूटबोर्ड) तुटलेला दिसत आहे. त्यामुळेच एक महिला खाली पडते. त्यानंतर बस चालक आणि बस कंडक्टर या सर्व घटनेची माहिती देताना दिसत आहे. बसच्या आजूबाजूला प्रवाशांनी खूप जास्त गर्दी केल्याचेही दिसत आहे.

Viral Video
Viral Video: अनोखा जुगाड ! Roof To Roof फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, चैन्नईतील एका बसमध्ये ही घटना घडली आहे. बसमधून उतरण्यासाठी एक महिला आपल्या जागेवर उभी राहिली. त्यावेळी बसचा खालचा भाग (फूटबोर्ड) तुटला आणि महिला खाली पडली. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच बस ड्रायव्हरनेदेखील लगेचच बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Viral Video
Viral Video: ऑनलाइन गेमचा नाद लयंच बेक्कार; लग्नात नवरदेव गेम खेळण्यात व्यस्त, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com