CSK vs RR: ऋतुराजचे शतक व्यर्थ; राजस्थाचा चैन्नई वर 'राॅयल' विजय
CSK vs RR: ऋतुराजचे शतक व्यर्थ; राजस्थाचा चैन्नई वर 'राॅयल' विजयTwitter

CSK vs RR: ऋतुराजचे शतक व्यर्थ; राजस्थाचा चैन्नई वर 'राॅयल' विजय

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी (CSK vs RR) राखून पराभव केला आहे.
Published on

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी (CSK vs RR) राखून पराभव केला आहे. अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, चेन्नई सुपर किंग्सने चमकदार फलंदाजी राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 3 गडी गमावून 190 धावा केल्या आणि सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 60 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने 5 षटकार आणि 9 चौकार मारले. सर्वांना वाटत होते हा सामनी चेन्नई सहज जिंकेल, पण तसे झाले नाही.

CSK vs RR: ऋतुराजचे शतक व्यर्थ; राजस्थाचा चैन्नई वर 'राॅयल' विजय
चीनसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान भारताने LAC वर आपली ताकद वाढवली

राजस्थान रॉयल्सचा पहिला सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashswi Jaiswal) 21 चेंडूत 50 धावा केल्या. यासह, तो सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा भारतीय खेळाडू बनला आहे. यशस्वी बाद झाल्यानंतर शिवम दुबेने मधल्या फळीत चमकदार अर्धशतक ठोकले आणि संघासाठी सामना जिंकला.

शिवमने 42 चेंडूत 64 धावा केल्या. राजस्थानने हा सामना जिंकत स्पर्धेत कायम राहिले आहेत. त्यांचे आता 10 पॉईंट्स आहेत. यापुढचेही सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत. त्याचबरोबर कोलकता, पंजाब, मुंबई ला देखील अजून प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे इथून पुढचे सामने रंगतदार होणार आहेत. चेन्नई आणि दिल्लीचा संघ प्लेऑफ साठी पात्र ठरले आहेत. आता अजून दोन संघांची प्रतिक्षा असणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com