आजकाल विविध पद्धतीने लग्न सोहळा पार पाडण्याचा ट्रेंड सुरू आहे. लोक रथातून किंवा कारमधून बऱ्याच वेळेस डान्स करत वाजत गाजत वरात घेवून जातात. प्रत्येकाच्या मोठ्या इच्छा असतात. मात्र त्या सगळ्याच पूर्ण होतात असे नाही. याची प्रचिती जळगावात झाली. जळगावात लाडक्या नवऱ्याने नवरीला सासरी घेऊन जाण्यासाठी कार, टांगा, बस न आणता चक्क हेलिकॉप्टर आणले. त्यावेळेस लग्नाचं अख्ख वऱ्हाड नवरीला निरोप द्यायला पोहोचले.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावात हा विवाह सोहळा पार पडला. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळात महत्वाचा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस. त्या दिवसाच्या आठवणी प्रत्येकाला जपून ठेवायच्या असतात. प्रत्येक जण आपल्या लग्णाच्या ठिकाणी झालेल्या एखाद्या प्रसंगातून आठवणी तयार करतात. मात्र जळगावातले हे जोडपे हेलिकॉप्टरमधल्या अद्भूत आठवणी ठेवणार आहे.
सोशल मीडियावर चाळीसगावामध्ये झालेल्या या लग्नाची जोरदार चर्चा झाली. चाळीसगाव तालूक्यातील प्रगतीच्या शिखरावर असणारे शेतकरी 'भिकन रामचंद्र परदेशी' यांची ही नात हेलिकॉप्टरमधून सासरी गेली. या नातीचे नाव प्रिया असून हिचा विवाह सोहळा सोमवारी चाळीसगाव येथील 'कोदगाव चौफुली' येथे पार पडला.
हेलिकॉप्टरमधून वरात नेणारा नवरा हा 'छत्रपती देविसिंग ठाकूर' यांचा चिरंजीव चेतन ठाकूर आहे. याने हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राइज देत हेलिकॉप्टरने आपल्या घरी म्हणजेच गंगापूरला नेले. गावात असा प्रथमच सोहळा पार पडला होता. त्यामुळे गावकरी प्रचंड खूश झाले होते. दरम्यान समस्त रांजणगावकर आपल्या गावच्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी हेलिपॅडवर उपस्थित होते.
Edited By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.