Viral Video: पुराच्या पाण्यात अडकला शेतकरी; बैलाने वाचवले प्राण; पाहा व्हिडिओ

Bull Sharp Instincts Save Farmer Life: सोशल मीडियावर तुम्हाला वारंवार अनेक अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मात्र, सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही विचारात पडाल. नक्की काय घडले ते एकदा पाहा.
Bull Sharp Instincts Save Farmer Life
Viral VideoSaam Tv
Published On

Jalna Flood News: गेल्या तीन ते चार दिवसात जालना जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून प्रवास करताना नागरिकांच्या तीन घटना समोर आल्या आहे. त्यातच नुकताच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पुराच्या पाण्यातून एक शेतकरी जनावरांना घेऊन जात होता मात्र जनावरांमुळे शेतकऱ्यांचा जीव बचावला गेला आहे. नक्की काय घडले तो सर्व प्रसंग समजण्यासाठी व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.

जालन्यातील घनसावंगी तालुक्यात काल मुसळधार पाऊस (Rainy Season) झाला.यामुळे नदी,नाल्यांना पूर आला.शेतकऱ्यांनी शेतात चरण्यासाठी नेलेली जनावरं घेऊन ते घरी परतण्यासाठी निघाले.पण नदी ओलांडताना पूर असल्यानं घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील दोन शेतकऱ्यांनी ताकद लावूनही बैलांनी पुराच्या पाण्यात नदी ओलांडण्याची तसदी घेतली नाही.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो यामुळे नद्यांना पूर आला आहे. मागील तीन दिवसांमध्ये पुराच्या पाण्यातून जीवघेणा आणि धोकादायक प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या तीन घटना समोर आल्या आहे, त्यामुळे पुराच्या पाण्यातून प्रवास न करणाऱ्या बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

जालनामधील हा व्हिडिओ(Video) सध्या युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला नेटकऱ्यांनी हजारो लाईक्स दिलेले असून त्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Bull Sharp Instincts Save Farmer Life
Satara Cloudburst: रस्त्यावर खळखळ पाणी, धारेत वाहनं अडकलेली; ढगसदृश्य पाऊस बघून थरकाप उडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com