Up Hit and Run: भयंकर! भरधाव कारने दुचाकीला ठोकलं, मग १ किमीपर्यंत फरफटत नेलं

uttar pradesh Shocking Accident: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. जिथे भररस्त्यात एका कारने दुचाकीला ठोकल आहे.मात्र, त्यानंतर जे घडलं अत्यंत धक्कादायक होतं.
uttar pradesh Shocking Accident
Up Hit and RunSaam Tv
Published On

uttar pradesh News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये रविवारी रात्री उशिरा एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मडियांव परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

घडलेल्या या घटनेत (Incident)अचित नावाचा एक तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, अचानक एका भरधाव कारने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्यानंतर अचितची बाईक कारमध्ये अडकली आणि कारचालकाने गाडी न थांबवता तब्बल १ किलोमीटरपर्यंत अचितच्या बाईकला फरफटत नेलं. मात्र, प्रसंगावधान राखत त्याने चालत्या गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवला.

या अपघाताच्या संपूर्ण थरारक व्हिडीओ जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी ही घटना पाहून संताप व्यक्त केला आहे आणि कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा व्हिडिओ( Video) सध्या इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटर अर्थात एक्स या प्रसिद्ध माध्यमांवर शेअर होत आहे आणि इन्स्टाग्रामवरील aajtak या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळालेले असून अनेक लाईक्स मिळालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

uttar pradesh Shocking Accident
Shocking Video: बापरे! ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन् महिला थोडक्यात वाचली; सीसीटीव्हीत कैद झाला थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com