Viral Video: रिसेप्शन पार्टीत चोराची फिल्मी एन्ट्री; पाहुणा म्हणून स्टेजवर आला आणि दागिन्यांची बॅग घेऊन पळाला

Bride jewelry and cash bag stolen from stage: जयपूरमधील लग्नसमारंभात रिसेप्शनदरम्यान नवरीची दागिने आणि पैशांची बॅग स्टेजवरून चोरीला गेली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Bride jewelry and cash bag stolen from stage
Bride jewelry and cash bag stolen from stagesaam tv
Published On

राजस्थानमधील जयपूरमधील लग्नसमारंभात झालेल्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. लग्नाच्या रिसेप्शनदरम्यान एक व्यक्ती पाहुणा असल्याचं दाखवत थेट स्टेजवर पोहोचते आणि नवरीचा दागिने आणि पैशांची भरलेली बॅग लंपास करून पळून जाते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय़.

कधी घडला हा प्रकार?

हा प्रकार ७ फेब्रुवारी रोजी घडल्याचं म्हटलं जातंय. जगतपुरा परिसरातील एका लग्न समारंभ हॉलमध्ये रिसेप्शन सुरू होतं. स्टेजवर नवरा-नवरी उभे होते आणि पाहुण्यांसोबत फोटोसेशन सुरू होतं. याच गडबडीत सर्वांचं लक्ष कॅमेऱ्याकडे असताना एक व्यक्ती शांतपणे स्टेजच्या मागील बाजूने पुढे येताना दिसतेय.

Bride jewelry and cash bag stolen from stage
Viral Video: मुंबईत TC ची पुन्हा मुजोरी, मराठीचा आग्रह धरल्याने प्रवाशाला धमकावलं; VIDEO पाहून नेटकरी संतापले

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवरील सोफ्याच्या बाजूला नवरीची बॅग ठेवलेली असते. संबंधित व्यक्ती आजूबाजूला पाहत सहजपणे पुढे येते आणि बॅग उचलते. यावेळी तो कोणालाही संशय न येऊ देता तिथून निघून जातो. हा प्रकार इतक्या वेगात घडलाय की, स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणाच्याही लक्षात आलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोरी झालेल्या बॅगमध्ये सुमारे चार लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने होते. कार्यक्रम संपल्यानंतर बॅग दिसत नसल्याचं लक्षात येताच लोकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यातून चोरी उघडकीस आली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Bride jewelry and cash bag stolen from stage
Viral Video: विना तिकीट लोकल प्रवास, टीसीनं अडवताच तरुणाने ठोकली धूम, VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून विविध कमेंट्स केल्या जातायत. काहींनी लग्नसमारंभात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याची टीका केलीये. तर काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, म्हणूनच बॅग नातेवाईकांकडे द्यायची असते.

Bride jewelry and cash bag stolen from stage
Viral Video: पहिल्यांदा Kiss, मग Ice Cream! मुलगी आणि हत्तीच्या पिल्लाच्या क्युट बॉन्डचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध सुरू केलाय. व्हायरल व्हिडीओमुळे लग्नसमारंभात मौल्यवान वस्तू स्टेजवर न ठेवण्याचा इशारा दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com