MP Viral News: अय्यो! एक WhatsApp DP अन् तब्बल ५० लाखांच्या चोरीचा उलघडा; कारनामा पाहून पोलिसही हादरले

Bhopal News: एका फोटोने केला ५० लाखांच्या चोरीचा पर्दाफाश | पाहा कसा झाला उलघडा....
MP Viral News
MP Viral NewsSaamtv

Madhya Pradesh Crime News: मध्यप्रदेशची राजधानी भोपालमधून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका फोटोवरुन चक्क ५० लाखांच्या चोरीचा उलघडा झाला आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. काय आहे या फोटोचा आणि ५० लाखांच्या चोरीचा संबंध चला जाणून घेवू..

MP Viral News
Viral Video Lawyers Clash: खळबळजनक! कोर्टातच दोन वकिलांमध्ये हाणामारी; पाहा घटनेचा VIDEO

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश (Madhya Pradesh) भोपाळच्या टीटी नगर पोलीस स्टेशन परिसरातील निशात कॉलनीत राहणारे डॉ. भूपेंद्र श्रीवास्तव यांनी त्यांच्या घरातून दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. भूपेंद्र श्रीवास्तव यांचे शहाजहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खासगी रुग्णालय आहे.

त्यांच्या घरातून गेल्या काही वर्षांपासून मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याचे आपल्या पोलिस तक्रारीत म्हणले होते. तसेच याच चोरीच्या संशयावरून 20 दिवसांपूर्वी मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र भूपेंद्र यांच्या पत्नीकडे मोलकरणीचा मोबाईल नंबर होता. ज्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली. (Bhopal News)

MP Viral News
Helmet Compulsion In Kolhapur : येत्या साेमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती; 'या' संस्थांपासून अंमलबजावणी

भूपेंद्र यांच्या पत्नीने मोलकरणीचा डीपी पाहिला तेव्हा मोलकरणीने स्पेशल कानातले घातलेले दिसले. अगदी तसेच कानातील त्यांच्याकडेही होते. त्यामुळे भूपेंद्र यांच्या पत्नीला संशय आल्याने लॉकर उघडून पाहिले. तर त्यात ठेवलेले कानातले गायब होते. त्यामुळे मोलकरणीने घरातील दागिने चोरले असावेत, असा संशय बळावला.

तक्रारीनंतर पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली, त्यानंतर तिने डॉक्टरांच्या घरात चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून बांगड्या, टॉप्स, नेकलेस, आणि सोन्याच्या बांगड्यांसह 50 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. यासोबतच साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com