Helmet Compulsion In Kolhapur : येत्या साेमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती; 'या' संस्थांपासून अंमलबजावणी

RTO ची स्वत:च्या कार्यालायापासून अंमलबजावणी.
kolhapur, helmet compulsion in kolhapur from this monday
kolhapur, helmet compulsion in kolhapur from this monday saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : काेल्हापूर जिल्ह्यात बेफाम वाहन चालविणाऱ्यांचा धुडगूस सुरू आहे. त्यातून वारंवार अपघात (accident) होऊन प्राणहानी होत आहे. या प्रकाराला पायबंध घालण्यासाठी काेल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा हेल्मेट (bikers now wearing helmet mandatory in kolhapur) सक्ती लागू करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (rto) त्याबाबतची अधिसूचना काढली आहे. (Breaking Marathi News)

kolhapur, helmet compulsion in kolhapur from this monday
Maharashtra News : निर्णय झाला, वितरण कधी ? शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रंग - एक गणवेश

नागरिकांच्या विशेषत: युवा वर्गाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे अशी माहिती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील (RTO) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. येत्या सोमवार (ता. 22 मे) पासून कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करुन वाहन चालवावे असे आवाहन पाटील यांनी केली आहे.

kolhapur, helmet compulsion in kolhapur from this monday
Police Bharti चा निकाल लागला अन् अख्ख गाव नाच नाच नाचलं, पहिल्यांदाच गावातील युवक बनला पाेलीस

पाटील म्हणाले पहिले आठ दिवस विना हेल्मेट वाहन चालविणा-यांवर कारवाई न करता त्यांना हेल्मेट परिधान केल्याची फायदे सांगितले जातील. संपुर्ण काेल्हापूर जिल्ह्यात हेल्मेटबाबतची जनजागृती केली जाईल. त्यानंतर विना हेल्मेट दुचाकीस्वारांकडून 1000 रुपये दंड घेतला जाईल.

kolhapur, helmet compulsion in kolhapur from this monday
Solapur Crime News : 18 दिवसाच्या बाळाला 3 लाखांना विकले, दहा जणांवर गुन्हा दाखल

विशेष म्हणजे दुचाकीस्वार ज्या संस्थेत, कार्यालयात, कंपनीत काम करतो त्या मालकाला देखील 1000 रुपये दंड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात (kolhapur) सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय आणि कॉलेज या संस्थांमधील कर्मचा-यांनी याची अंमलबजावणी करावी यासाठी यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याचे पाटील यांनी नमदू केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com