Maharashtra News : निर्णय झाला, वितरण कधी ? शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रंग - एक गणवेश

शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे निर्णयाकडे लागू राहिलं लक्ष.
School Uniform, maharashtra , zilla parishad school, students
School Uniform, maharashtra , zilla parishad school, studentssaam tv
Published On

Maharashtra News : राज्यातील सरकारी शाळेत (zilla parishad school) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश कधीपर्यंत अंतिम होऊन कधी शाळेत पोहचणार असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पडला आहे. राज्यभरातील सरकारी शाळेत एकाच रंगातला गणवेश (once colour school uniform in maharashtra government schools) देण्याचा निर्णय सरकारनं (maharashtra government) घेतला आहे. मात्र, १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने गणवेशांच्या वितरणाबाबत तांत्रिक अडचणींमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

School Uniform, maharashtra , zilla parishad school, students
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

यावर्षी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने त्याची तयारी आत्तापासून सुरु केली आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके पोहोचतील यासाठी नियाेजन करण्यात आले आहे.

School Uniform, maharashtra , zilla parishad school, students
बेधुंद तू बेछूट मी... 36 Nakhrewali.., पत्रकारांना मारहाण करणारे पाच जण पाेलीसांच्या ताब्यात, Gautami Patil कार्यक्रमाचे आयाेजकही अडचणीत (पाहा व्हिडिओ)

राज्यातील सरकारी शाळेतील मुलांना यावर्षीपासून एक रंग एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु हाेण्यास महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना गणवेश कधी मिळणार ? कोण देणार ? यावर अद्याप विचार विनिमय सुरू आहे.

यासंदर्भात शिक्षण विभागाला (education department) अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. राज्यभरासाठी वितरकाकडून गणवेश घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माप कसे घेतले जाणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com