शरीराची स्वच्छता राखण्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो. अनेकजण दिवसातून दोनदा अंघोळ करतात. भारतात श्रद्धाळू लोकांची संख्या जास्त असल्यानं अंघोळीशिवाय दिवस सुरूच होत नाही. मात्र दररोज अंघोळ करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, याबाबत सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय. विज्ञानाचा दाखला देऊन हा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये काय म्हंटलंय जाणून घेऊ...
विज्ञानानुसार दररोज अंघोळ केल्यानं रोगप्रतिकारक्षमता कमी होते. थंड पाण्यानं दररोज अंघोळ करणं धोकादायक असल्याचं स्किन स्पेशलिस्ट सांगतात. अंघोळ केल्यानं स्किनमधील नॅचरल ऑईल आणि गुड बॅक्टेरिया निघून जातात. या दोन्ही गोष्टी आपल्या इम्यून सिस्टमसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवसच अंघोळ करायला हवी.
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मन प्रसन्न राहण्यासाठी अंघोळ तर हवीच. मात्र या दाव्यामुळे अनेकांध्ये अंघोळीबाबत संभ्रम निर्माण झालाय. अंघोळ न करणं आरोग्यासाठी खरंच उपयुक्त आहे का? हे जाणून घेऊ...
परदेशातील काही देश आणि भारतातील वातावरण यात खूप मोठा फरक आहे. आपल्या देशात बहुतांश भागात दमट हवामान असतं. त्यामुळे आपल्याला खूपदा घाम येतो. शिवाय आपल्याकडे धुळीचं प्रमाणही अधिक आहे. नियमितपणे अंघोळ न केल्यास त्वचेचे रोग होऊ शकतात. शरीरावरील घाण नीट स्वच्छ न केल्यास आजारांना निमंत्रण मिळू शकतं. अंघोळ केल्यानं शरीरावरील बॅक्टेरिया मरून जातात. अंघोळीसाठी कोमट पाणी फायदेशीर आहे.
त्यामुळे आमच्या पडताळणीत दररोज अंघोळ केल्यानं रोगप्रतिकारक्षमता कमी होत असल्याचा दावा असत्य ठरलाय. आपल्या देशातील हवामान आणि प्रदूषण लक्षात घेता दररोज अंघोळ करणं आवश्यक आहे. तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.