भारताचा भालाफेक स्टार ॲथलीट नीरज चोप्रा आणि नेमबाज मनू भाकर सध्या खुप चर्चेत आहेत. या दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला गौरव मिळवून दिला. मनूने वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले, तर नीरजने या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले. मात्र फक्त पॅरिस ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे हे दोन्ही खेळाडू चर्चेत आहेत असे नाही तर याचे कारण वेगळे आहे. सोशल मीडियावर सध्या या खेळाडूंचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांच्या भेटीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अलीकडेच नीरज चोप्राने मनू भाकरच्या आईची भेट घेतली, त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी घडू शकते, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. या भेटीच्या व्हिडीयोवर अनेक कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे शिवाय अनेक तर्कवितर्क देखिल लावले जात आहेत.
नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोघांनीही देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर मनू भाकरने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. त्यांच्या भेटीच्या वृत्तानंतर चाहते खूप उत्सुक आहेत आणि दोघांमध्ये काहीतरी घडण्याची शक्यता आहे.
मनू भाकरच्या आईसोबत झालेल्या भेटीदरम्यान नीरज चोप्राने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला काहीतरी वचन दिले होते, त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी घडू शकते असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. कारण यावेळी मनूची आई आणि नीरज यांच्यामध्ये विशिष्ट संवाद झाला आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. यानंतर चाहते दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि दोघांमध्ये काहीतरी घडण्याची शक्यता आहे असे सांगत आहेत. शिवाय काही चाहत्यांनी तर त्यांचे नाते पक्के झाले आहे आणि दोन्ही लवकरच लग्न करणार असल्याचे देखिल म्हंटले आहे.
नीरज चोप्रा आणि मनू भाकर दोघेही हरियाणा राज्यातून आले आहेत. मनू झज्जर, तर नीरज चोप्रा हे पानिपत जिल्ह्यातील आहेत. मनू भाकर आणि नीरज चोप्रा पॅरिस ऑलिंपिक २०२४ च्या समारोप समारंभात भारतासाठी ध्वजवाहक असणार होते, परंतु शेवटच्या क्षणी योजना बदलण्यात आली. या कारणास्तव, नीरज चोप्राच्या जागी पीआर श्रीजेशची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली.
आता या चर्चांसंदर्भात मनू आणि नीरज काय बोलतात यासोबतच आगामी काळात या दोघांमध्ये काही वेगळी केमिस्ट्री बघायला मिळते का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.