Bangladesh Crsis: शेख हसीना यांच्यामुळेच देश पेटला; आंदोलकांवर गोळ्या झाडा, माजी पंतप्रधानांचे लष्कराला आदेश
Bangladesh Crsis

Bangladesh Crisis: शेख हसीना यांच्यामुळेच देश पेटला; आंदोलकांवर गोळ्या झाडा,माजी पंतप्रधानांचे लष्कराला आदेश

Bangladesh Crisis: रॉयटर्सने बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेख हसीना यांनी देशातून पळून जाण्याच्या आदल्या रात्री लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि दंगल शांत करण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.
Published on

बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हिंसक आंदोलन सुरू झाल्याने त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आश्रय घ्यावा लागलाय. हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती सातत्याने बदलत आहे. हसीना यांच्या पक्ष अवामी दलाच्या नेत्यांची हत्या केली जातेय.

आतापर्यंत २० नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. इतकेच नाही तर हिंदूंवर देखील गंभीर अत्याचार झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यांच्या घरांची तोडफोड झाली आणि अनेक मंदिरे जाळली गेली आहेत. हसीना गेल्यापासून बांगलादेशात किमान १०० लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान हसीना सरकार उलथून टाकण्याशी संबंधित एक नवीन अहवाल समोर आलाय.

रॉयटर्सने बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेख हसीना यांनी देशातून पळून जाण्याच्या आदल्या रात्री लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. दंगल शांत करण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी हा आदेश स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि सैन्य बंडखोरांमध्ये सामील झाले. ज्याचा परिणाम पंतप्रधान शेख हसीना यांना आपलं घर आणि देश सोडून पळ काढावा लागला.

बांगलादेशात 15 वर्षे सत्तेत असलेल्या सर्वात शक्तिशाली नेत्या शेख हसीना यांना दोन महिन्यांच्या प्रदीर्घ बंडखोरीमुळे तेथून पळ काढावा लागला. दरम्यान सरकारी निवासस्थानातून घाईघाईने पळून जाण्याच्या आदल्या रात्री शेख हसीना यांनी आंदोलने थांबवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ज्यात त्यांनी लष्करप्रमुखांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. लष्करप्रमुखांनी आपल्या जनरल्ससोबतच्या बैठकीत याचा खुलासा केला.

दोन सेवारत लष्करी अधिकाऱ्यांनी, नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, लष्कराने देशभरात कडक कर्फ्यू लागू न करण्याचे आणि नागरिकांवर गोळीबार न करण्याचे सांगितले. यावेळी लष्कराने शेख हसीना यांना स्पष्ट सांगितलं की, लष्कर त्यांच्यासोबत नाही. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जनरल वकार-उझ-झमान यांनी हसीनाच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांचे सैन्य तिच्या कडक कर्फ्यू आदेशाची अंमलबजावणी करू शकत नाही. म्हणजेच लष्कर हसीना यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं.

दरम्यान बांगलादेशातील हिंसाचारात मृतांचा आकडा ४४० वर पोहोचलाय. हसीनाच्या राजीनाम्यानंतर लष्कराने सत्ता काबीज केली. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी संसद विसर्जित केली आणि आगामी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस (84) यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Bangladesh Crsis: शेख हसीना यांच्यामुळेच देश पेटला; आंदोलकांवर गोळ्या झाडा, माजी पंतप्रधानांचे लष्कराला आदेश
Bangladesh Clash : शेख हसीना यांच्या समर्थक २९ नेत्यांचे मृतदेह सापडले, बांगलादेशात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com