Bangladesh Clash : शेख हसीना यांच्या समर्थक २९ नेत्यांचे मृतदेह सापडले, बांगलादेशात खळबळ

bangladesh clash update : शेख हसीना यांच्या समर्थक २९ नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत. शेख हसीना यांच्या समर्थकांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील आंदोलनाची जगभरात चर्चा सुरु आहे.
Bangladesh
Bangladesh Clash
Published On

नवी दिल्ली : बांगलादेशात अराजकता पसरल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता पसरली आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक वास्तूसह वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. आंदोलकांनी तेथील देवळांचीही तोडफोड केली आहे. आंदोलकांनी काही नेत्यांच्या घरांनाही आग लावली. याचदरम्यान, शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी संबंधित २९ नेत्यांचे मृतदेह आढळून आले आहे. या नेत्यांसहित त्यांच्या कुटुंबियांचेही मृतदेह आढळले आहे. यामुळे बांगलादेशात खळबळ उडाली आहे.

सोमवारी शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी देश सोडल्याचं वृत्त समोर आलं. या देशात एकच खळबळ उडाली. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात कमीत कमी १० जणांचा मृत्यू झाला होता.

Bangladesh
Bangladesh News: मोठी बातमी! मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य

माजी आमदाराच्या घरात ६ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील कोमिला येथे आंदोलकांच्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. अशोकतला येथील माजी आमदार मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला आंदोलकांनी पेटवून दिलं. या आगीनंतर घरातील सहा जणांचा मृत्यू झाला. यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून ६ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यात सैन्य दलातील ५ जवान देखील होते.

माजी आमदाराच्या घरातील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. १२ वर्षीय शॉन, १४ वर्षीय शकील, १६ वर्षीय रोनी, १७ वर्षीय मोहीन आणि २२ वर्षीय महफुजुर रहमानचाही समावेश आहे.

Bangladesh
Bangladesh Crisis: बांगलादेशातली अराजकता टोकाला; देशभरात हिंसाचार, लुटालूट

अनेकांची प्रकृती गंभीर

संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात तळमजल्याला आग लावली. तर तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांचा धूरामुळे मृत्यू झाला आहे. तर काहींचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत कमीत कमी १० जखमी झाले आहे. यात गंभीर जखमी झालेल्यांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com