Bangladesh Crisis: बांगलादेशातली अराजकता टोकाला; देशभरात हिंसाचार, लुटालूट

Bangladesh Crisis: बांगलादेशात आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हे आंदोलन इतकं तापलं देशात सत्ता बदल झालाय. देशाचे पंतप्रधान शेख हसिना यांना थेट देश सोडावा लागलाय.
Bangladesh Crisis: बांगलादेशातली अराजकता टोकाला; देशभरात हिंसाचार, लुटालूट
Bangladesh CrisisIndia Today
Published On

शेख हसिना यांनी पंतप्रधानपदा राजीनामा देऊन देश सोडून भारतात आश्रय घेतला खरा मात्र तिकडे बागलादेशातली अराजकता टोकाला गेलीय. देशातली जनता रस्त्यावर उतरलीय. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या या यादवीमुळे सगळीकडे हिंसात्मक घटना सुरू आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये घुसून समाजकंटकांची मनमानी सुरू आहे. सगळीकडे नुसती लुटालूट सुरू आहे. घरातील मासे, चिकन आणि फर्निचरही पळवून नेलं आहे.

ढाका पॅलेसमध्ये घुसून कुणी चक्क लॉलीपॉप खात होतं. तर कोणी बेडवर जाऊन बसले. संतप्त जमावाने ढाका पॅलेसनंतर संसदेत शिरुन धुडगूस घातला. कुणी संसदेतील खुर्चीत बसून सेल्फी काढलेत तर कुणी साहित्यांची तोडफोड केल्याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

नाही तर बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान असणा-या बंगबंधू आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांचा पुतळा जेसीबी लावून जमीदोस्त केलाय. देशात लवकरच हंगामी सरकार स्थापन होणार असल्याचं आश्वासन दिलंय. हंगामी सरकारचं नेतृत्व नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. तर युनूस यांनी हंगामी सरकारचा सल्लागार होण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय. त्यामुळे बांगलादेश या संघर्षातून नेमका कधी सावरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्या भारताच्या आश्रयाला आल्यात. त्यामुळे बांगलादेशी जनतेनं अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केलंय. बांगलादेशच्या खुलना विभागात असलेल्या मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू या हिंसक आंदोलनात झालाय. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आंदोलकांनी थेट पंतप्रधानांच्या घरावर कब्जा केलाय.

Bangladesh Crisis: बांगलादेशातली अराजकता टोकाला; देशभरात हिंसाचार, लुटालूट
Bangladesh Riot: बांगलादेशात अराजकता, ठीक-ठिकाणी घरांची जाळपोळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com