Mumbai Crime: हात-पाय बांधून मारहाण, व्हिडीओ कॉल करत केली हत्या; दादर सुटकेस प्रकरणाचा २४ तासांत छडा

Dadar Suitcase Dead Body Case: पायधुणी येथे अर्शद अली शेखची रविवारी हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दादर रेल्वे स्थानकावर त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
Mumbai Crime: हात-पाय बांधून मारहाण, व्हिडीओ कॉल करत केली हत्या; दादर सुटकेस प्रकरणाचा असा झाला उलगडा
Dadar Suitcase Dead Body CaseSaam Tv
Published On

दादरमधील सुटकेस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणाचा २४ तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पायधुणी येथे अर्शद अली शेखची रविवारी हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दादर रेल्वे स्थानकावर त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.

दादर रेल्वे स्थानकात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेमध्ये मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुक आणि कर्ण बधीर अर्शद अली शेखची (३० वर्षे) त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केली. आरोपींनी अर्शदची हत्या करताना आपल्या मित्रांना व्हिडीओ कॉल केला होता. अर्शदच्या हत्येचा व्हिडीओ सामच्या हाती लागला आहे. नग्न करून आणि हात-पाय बांधून आधी अर्शदला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. पण त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली.

हत्या करण्यात आलेला अर्शद अली सादीक शेख आणि आरोपी जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मित्र होते. तिघेही मूकबधिर होते. क्रिकेट खेळताना त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. हे तिघेही नेहमी एकमेकांना भेटत होते. रविवारी रात्री तिघांनी जयच्या घरी भेटण्याचा प्लान केला. तिघेही दारु प्यायला बसले होते. त्याचवेळी शिवजीत आणि अर्शद यांचे भांडण झाले. या भांडणानंतर संतापलेल्या शिवजीतने अर्शदचे हाय-पाय बांधले, त्याचे कपडे काढले. नग्न करून त्याला बेदम मारहाण केली. जयने व्हिडीओ कॉल करत इतर मित्रांना अर्शदची हत्या लाइव्ह दाखवली.

शिवजीत मारहाण करत असताना अर्शद त्याच्याकडे हात जोडून विनंती करत होता. पण तो काही ऐकत नव्हता. अतिशय निर्दयीपणे तो त्याला मारहाण करतच राहिला. शिवजीतने जयच्या घरामध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यावर वार केले. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या अर्शदचा जागीच मृ्त्यू झाला. हत्येनंतर शिवजीतने जयला धमकावत अर्शदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. जय एका बॅगेत अर्शदचा मृतदेह भरून दादर रेल्वे स्थानकावर गेला. त्याठिकाणी त्याने तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.

रविवारी रात्री उशिरा दादर रेल्वे स्थानकात बॅगेत मृतदेह सापडल्याने दादर रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. अर्शदच्या हत्येप्रकरणी जय चावडा आणि शिवाजित सिंग यांना अटक करण्यात आली आहे. शिवजीत सिंगच्या मैत्रिणीला अर्शद अली त्रास देत असल्याच्या संशयावरून आणि पैश्याच्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत असून सर्व बाजूने तपास करत आहेत. दोन्ही आरोपी देखील मुक आणि कर्ण बधीर असल्याने तपासात पोलिसांना अनेक अडथळे येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com