Sunetra Pawar: बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही; दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्धार

बीडच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिक्षण आणि विकासावर भर देण्याचं सांगितलं. आई-वडिलांच्या हातातील कोयत्याऐवजी मुलांच्या हातात पेन आणि वही यावी, पुढील पिढीचं भविष्य घडावं आणि बीडचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला

ज्या आई-वडिलांच्या हातात आयुष्यभर कोयता राहिला, त्यांच्या मुलांच्या हातात पेन आणि वही यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार सातत्याने काम करत असून, शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून पुढील पिढीचं भविष्य घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दादांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, त्यावेळी बीडच्या विकासाची अनेक स्वप्नं त्यांच्या मनात होती. ही स्वप्नं आता थांबवायची नाहीत, तर ती पूर्णत्वास न्यायची आहेत. “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही,” असं दादांनी यापूर्वी म्हटलं होतं. तुमची साथ आणि सहकार्य राहिलं, तर हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संपूर्ण इमारतीची पाहणी केली असून याठिकाणी अतिशय सुंदर काम झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ घोषणा करून प्रशासन चालत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते, हे दादांनी आम्हाला शिकवलंय. त्याच पावलावर पाऊल ठेवून विकासकामे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com