नवरात्रोत्सवात सर्वसामान्यांना झटका बसला आहे. भाज्यांचे दर महागल्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा कात्री लागली आहे. सणासुदीच्या काळात भाजीपाल्याची मागणी वाढल्याने आणि आवक विस्कळीत झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईच्या वाशी एपीएमसी बाजारात पालेभाज्यांचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचलेय. मेथी आणि कोथिंबिरीचे दर ५ पट वाढले असून, भेंडी, फ्लॉवर आणि हिरवी मिरचीचे भावही दुप्पट झाले आहेत. दसऱ्यापर्यंत हे दर असेच चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, वर्षभरात ४२ पैकी ४१ वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. बटाटा सोडला तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. साखर २२ टक्क्यांनी तर सूर्यफुलाचं तेल १८ टक्क्यांनी महागले आहे. तांदूळ, गहू, डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.