Breaking News

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेच्या लग्नात सुपेकर मामींनी केलं दीड लाखांचं रुखवत, वडिलांकडूनच घेतले होते पैसे | VIDEO

New Twist in Vaishnavi Hagwane Case: जालींदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी एक गंभीर आरोप केला आहे.
video

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालींदर सुपेकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आपला हगवणे कुटुंबाशी काही संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी अजून एक गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जालींदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता, आणि त्यासाठी कस्पटे कुटुंबियांकडून त्यांनी 1 लाख 50 हजार रुपये घेतले होते. वैष्णवी हगवणेच्या लग्नात दीड लाख रुपयांचा रुखवत दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दामनिया यांनी दिली आहे. तसेच जालींदर सुपेकर यांची पत्नी यांनीच हा रुखवत बनवल्याचं कस्पटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com